पायंडा विलिनीकरणाचा
             Date:

    अद्ययावत सेवा...


    आधुनिकतेची कास धरणार्‍या जनता सहकारी बँकेने बँकिंग संबंधीच्या सर्व सेवा सुविधा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी खास मोबाईल बँकिंग सेवा प्रणाली तयार केली आहे. ही सुविधा देखील सुरू झाली असून अनेक ग्राहकांना त्याचा फायदा होत आहे. या सुविधेमुळे जनता बँकेच्या ६७ शाखांमधील ग्राहकांना २४ तास आणि ३६५ दिवस मोबाईलच्या एका क्लिकवर आपल्या खात्यावरील शिल्लक पाहणे, मुदतठेव खाते उघडणे, स्वत:च्या अन्य बँकांच्या खात्यांमध्ये हस्तांतरण करणे, मोबाईल, केबल टी.व्ही रिचार्ज, वीज, विमा, दूरध्वनी इ. देयकांचा भरणा करणे सहज शक्य होत आहे. ‘जनता बँक मोबाईल अ‍ॅप’ या नावाने हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध असून अधिकाधिक खातेदारांनी या आधुनिक सेवेचा लाभ घेतला पाहिजे. जनता सहकारी बँकेनेदेखील बँकिंग क्षेत्रातील आधुनिकता आत्मसात करून आपल्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, `एनिवेअर बँकिंग`, `कोअर बँकिंग`, `डीमॅट`, विमा, ’आरटीजीएस, नेफ्ट’ यासारख्या अत्याधुनिक बँकिंग सेवा अतिशय अल्प दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. बँकेने आपले स्वत:चे अत्याधुनिक डेटा सेंटर उभारले असून या डेटा सेंटरचा उपयोग सध्या राज्यातील अन्य लहान सहकारी बँकादेखील करून घेत आहेत. 

    आगामी काळात देखील शाखा विस्ताराच्या माध्यमातून तसेच खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँका देत असलेल्या आधुनिक सेवा सुविधा जनता सहकारी बँकेच्या ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा जनता बँकेच्या संचालक मंडळाचा तसेच व्यवस्थापनाचा मानस आहे. जनता सहकारी बँकेवर असणारे ग्राहकांचे अपार प्रेम आणि विश्‍वास भविष्य काळात असाच दृढ राहील यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.