Date: |
राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ‘एबीपी माझा व जनता सहकारी बँक, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ‘माझा महाराष्ट्र-माझं व्हिजन समिट’ हा विशेष कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला.
या परिषदेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासह, सहकार, सार्वजनिक बांधकाम व महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री श्री. नारायण राणे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री श्री. जयंत पाटील आदी मान्यवरांनी महाराष्ट्राच्या विकासाविषयी आपली व्हिजन मांडली व उपस्थित मान्यवरांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
या कार्यक्रमात जनता बँकेचे उपाध्यक्ष श्री. संजय लेले यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले.
मागील दोन वर्षात राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजना तसेच पुढील काळातील सरकारचे विकासा चे नियोजन याबाबत मुख्यमंत्री श्री. फडणवीस व इतर सर्व मान्यवर मंत्री महोदयांनी विस्तृत निवेदन केले, संबंधीत विभागांसह राज्याच्या विकासाविषयीचा आपला दृष्टिकोन विस्ताराने मांडला.
तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
अशा प्रकारच्या वेगळ्या कार्यक्रमाच्या पाठिशी जनता सहकारी बँक खंबीरपणे उभी असल्याचा बँकेला अभिमान व आनंद आहे.