इव्हेंट्स
             Date:

    लोकांनी अनुभवला जनता बँकेचा लोगो, त्यामागील भूमिका आणि प्रवास 

    एखाद्या संस्थेची किंवा कंपनीची ओळख निर्माण होते ती लोगोतूनच. आकर्षक लोगोच्या मागे एक वेगळेपण आणि त्या कंपनीची माहिती दडलेली असते. अशाच वैविध्यपूर्ण लोगोंचे प्रदर्शन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत ‘वर्ल्ड ऑफ लोगोज्’ या नावाने भरले होते. ‘स्मार्ट चॅम्प्स्’ आणि ‘अ‍ॅड-अ‍ॅप्ट’ या संस्थांनी हे प्रदर्शन भरविले होते. या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनास जनता सहकारी बँकेने आर्थिक सहका​र्याच्या रूपाने पाठबळ दिले​ होते. 

    विविध कंपन्यांचे आणि संस्थांचे सुमारे एक हजाराहून अधिक लोगो पाहण्याची या निमित्ताने पुणेकरांना संधी मिळाली. प्रत्येक लोगोमागे दडलेले रहस्य, त्याची वैशिष्ट्ये आणि लोगोचा होणारा वापर अशी माहिती या प्रदर्शनातून देण्यात आली. अभिजित जोग यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी 'स्मार्ट चॅम्प्स'चे संचालक रवींद्र नाईक, गौरांगी पुरोहित, रौनक नाईक, डॉ. दीपक गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात जनता सहकारी बँकेच्या लोगोचेही सादरीकरण करण्यात आले व या लोगोमागील संकल्पनाही स्पष्ट करण्यात आली. या लोगोविषयी ​लोकांनी आवर्जून माहिती करून घेतली व चौकशीही केली.​