‘जनता बँक मोबाईल अॅरप’चा सक्षम पर्याय
             Date:

    विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशातील एकूण अर्थव्यवस्था अधिक गतीने बदलाच्या दिशेने वाटचाल करते आहे. अगदी सामान्यातल्या सामान्य माणसापासून प्रत्येकालाच आज डिजिटल बँकिंगचा पर्याय आत्मसात करावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तसे आवाहन देशवासीयांना केले आहे. 



    देशात होणार्‍या या मोठ्या बदलासाठी जनता सहकारी बँक आधीपासूनच सज्ज आहे. ‘जनता बँक मोबाईल अ‍ॅप’व्दारे डिजिटल बँकिंगची सेवा आमच्या ग्राहकांसाठी आम्ही देऊ केली आहे. या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार करता येणार असून, त्याचा बँकेसंदर्भातील इतर कामांसाठी देखील उपयोग करता येऊ शकतो. 

     

    कसे आहे हे ‘जनता बँक अ‍ॅप’?

    जनता सहकारी बँक मोबाईल अ‍ॅप सद्यःस्थितीला प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, ते विनामूल्य डाऊनलोड करता येऊ शकते. जनता बँकेचा लोगो असलेले अ‍ॅप ऑथराईज्ड असून, अँड्राईड फोन वापरणार्‍या प्रत्येकाला त्याला लाभ घेता येणार आहे. हे अ‍ॅप वापरण्यास अतिशय सोपे असल्याने अल्पावधीतच याची लोकप्रियता वाढली असून, त्याला 4.3 स्टार रेटिंग मिळाले आहे. 

     

    काय आहेत ‘जनता बँक मोबाईल अ‍ॅप’ची वैशिष्ट्ये...

    सध्या चलनाचा तुटवडा असल्याने बरेच व्यवहार हे ऑनलाईनच केले जात आहेत. दूध घेण्यापासून ते अगदी मोठ्या खरेदीपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी डेबिट कार्ड, पेटीएम किंवा मोबिलिंकचा वापर केला जातो. जनता बँकेच्या अ‍ॅपच्या माध्यमातूनही अगदी अशाच प्रकारे तुम्ही तुमचे दैनंदिन व्यवहार अतिशय सोप्या पद्धतीने करू शकता. विविध प्रकारच्या बिलांचा भरणादेखील तुम्ही या अ‍ॅपद्वारे करू शकता.

     

    या अ‍ॅपची आणखी वैशिष्ट्ये या पुढील न्यूजलेटरमधून आम्ही आपल्यासमोर मांडू. तोपर्यंत तुम्ही हे अ‍ॅप नक्कीच डाऊनलोड कराल, याची आम्हाला खात्री आहे.