Date: |
मागील काही वर्षांमध्ये आर्थिक क्षेत्रातील उलाढाली अधिक गतिमान झालेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. अशा परिस्थितीत ग्राहक, सभासदांच्या विश्वासावर व कर्मचाऱ्यांच्या बळावर सातत्याने चांगली कामगिरी करीत सहकार क्षेत्रात एक अढळ व मानाचं स्थानं जनता सहकारी बँकेने निर्माण केले आहे, ते टिकवून ठेवले आहे.
आज या ई- न्यूजलटेरच्या अंकात बँकेच्या शाखाविस्तारांचा विषय व आवाहन आपणासमोर मांडतो आहोत. २५ मे २०१५ रोजी अहमदनगर व गोरेगाव (मुंबई) येथे जनता बँकेच्या नव्या दोन शाखांचा शुभारंभ होतो आहे. ही आनंदाची आणि अभिमानाची घडामोड आहे. जनता सहकारी बँकेच्या आम्हा सर्व संचालक मंडळास, अधिकारी व कर्मचाऱ्यांना खात्री आहे की, अहमदनगर व गोरेगावकर मंडळी आमच्या या प्रयत्नांना ग्राहक रूपाने सक्रीय सहभागी होऊन पाठबळ देतील...
ग्राहकविश्वासाचं हे बळ बँकेने ज्या अनेकविध अत्याधुनिक सुविधांच्या व योजनांच्या आधारे मिळविले आहे. त्यापैकीच एक वानगीदाखल योजना म्हणून `पंतप्रधान बिमा योजने`चा निधी बँकेच्या सन्माननीय ग्राहकास त्यांच्या अडचणींच्या काळात उपलब्ध करून देता आला... ही भावना आम्हा सर्वांसाठी खुप मोठी आहे. अशा मदतीनेचे जनता बँक आणि ग्राहकांतील विश्वासाचे ऋणानुबंध अधिक दृढ केले आहेत. ते यापुढेही होत राहतील