मा. श्री. कदम व मा. श्री. बेडेकर यांची प्रतिक्रिया
             Date:

    सहकार क्षेत्र हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्यपूर्ण असे वैभव आहे. परस्पर विश्वास या सर्व विकास व व्यवहारांचा मुलभूत पाया आहे. सहकार क्षेत्रातील स्वाभाविक संघर्षांपूर्ण चढउतार बँकेने अनुभवले आणि त्यावर याच सन्माननीय ग्राहक व आपणा सर्वांच्या बळावर यशस्वी मातही केली. अशा विश्वासाच्या जोरावरच बँकेने शंभर कोटी रूपयांच्या ठेवी मिळविण्याचे आव्हान देखील एका दिवसांत सहजसाध्य केले.

    सहकार क्षेत्रात देशपातळीवर आपला वेगळा ठसा उमटविणारी एक अग्रगण्य वित्तीय संस्था म्हणून जनता सहकारी बँक सुपरचित आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठी अत्याधुनिक सेवांच्या उपलब्धतेसोबतच विश्वासार्ह आर्थिक व्यवहाराचे केंद्र म्हणून बँक सुपरिचीत आहे. जी आजच्या घडीला खुप अभिमानाची व महत्त्वाची बाब आहे. या सेवा उपलब्ध करून देताना असंख्य ग्राहकांच्या अपेक्षांना व आग्रहाला प्राधान्य देत विस्ताराचे ध्येय लक्षात घेऊन २५ मे २०१६ रोजी अहमदनगर आणि गोरेगाव (मुंबई) येथे जनता सहकारी बँकेच्या दोन नव्या शाखा सुरू होत आहेत.


    `सेंट्रलाईज प्रोसेसिंग युनिट`सारख्या सुविधेसह मुंबईत हा विस्तार दहा शाखांपर्यंत नेण्याचा बँकेचा प्रयत्न असणार आहेत. या दोन्ही ठिकाणी बँकेच्या या विस्ताराविषयी मान्यवर संचालकांनी बँकेची भूमिका मांडत नगरकर व गोरेगावकर मंडळींना सहकार्य व सक्रिय सहभागाचे आवाहन केले आहे