अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर करा - घर किंवा वाहनखरेदी!
             Date:


     

    ‘आवाक्यातील घरांच्या निर्मिती’करिता केंद्र सरकारतर्फे नव्याने धोरणं राबविले जात आहेत. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातही त्यावर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर ‘रिअल इस्टेट बिल २०१६’ संदर्भातही केंद्र सरकारने घेतलेला निर्णय ग्राहकांसाठी अधिक निश्‍चिंतीचे वातावरण निर्माण करून देणारा आहे. या दोन्ही निर्णयांमुळे घर खरेदीबाबत ग्राहकांची मानसिकता सकारात्मकरित्या बदलण्यात खूप फायदा झाला आहे. याबाबत आणखी एक आनंदाची बाब म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेनेही मागील महिन्यात रेपो रेट दरात पाव टक्क्यांनी कमी केला आहे. एकंदरीत घरखरेदीसाठी सध्याचा हा काळ योग्य असून त्याकरिता अक्षयतृतीयेहून अधिक चांगला मुहूर्त मिळणे कठीण आहे.

     

     

    अधिकाधिक ग्राहकांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी जनता बँकेचेही घरकर्ज व वाहनकर्जाचे व्याजदर सामान्यांच्या आवाक्यातील असतील असेच आहेत. बँकेतर्फे सध्या जास्तीत जास्त ५० लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

    घरकर्ज व वाहनकर्जाची प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुलभ असून ग्राहकांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यास अवघ्या काही दिवसांत गृहकर्ज मंजूर केले जाते. त्यामुळे अक्षय तृतीयेचा सर्वोत्तम मुहूर्त साधून घराचे किंवा वाहनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या जवळच्या जनता बँकेच्या शाखेला आजच भेट द्या...!