गणपती बाप्पा मोरया, आम्ही आलो तुझ्या गावा!
             Date:


    पेण म्हटलं की काही क्षणात गणरायाची सर्वांगसुंदर मुर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते कारण तीच तर पेणची सर्वदूर ओळख आहे. शाडूपासून बनविण्यात आलेल्या पेणच्या मूर्ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशासह, जगभरात मोठ्या श्रद्धेनं पोहचतात आणि अनेकांच्या घरात विराजमानही होतात. गणरायांच्या मूर्तीचं उगमस्थान असणाऱ्या याच पेण मध्ये बाप्पाचा आशीर्वाद सोबत घेऊन जनता सहकारी बँकेची नवीन शाखा सुरू झाली आहे.

    पुणे शहरातून सुरू झालेला जनता बँकेचा हा प्रवास संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी पद्धतीने सुरू असून पेण मधील ही बँकेची 66 वी शाखा आहे. अर्थातच आजपर्यंतच्या यशस्वी प्रवासात गणपती बाप्पा आणि तुमच्यासार‘या सर्व ग्राहकराजाने आम्हाला मोलाची साथ दिली, त्यामुळेच हा प्रवास सुखकारक होऊ शकला आहे.

     


    पेण नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ. प्रितम पाटील यांच्या हस्ते जनता बँकेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच ‘एटीएम’ सेवेचा शुभारंभ बँकेचे अध्यक्ष अरविंद खळदकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाखा व्यवस्थापक नरेंद्र अत्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत केतकर, उपाध्यक्ष लेले व संचालकीय मंडळ आणि इतर कर्मचारी वर्ग व पेणकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    बदलत्या काळानुसार आधुनिक बँकिंग सेवा देण्याच्या उद्देशाने जनता बँकेने पेणमध्ये ही शाखा सुरू केली आहे. वीर सावरकर मार्गावरील ‘एमएससीबी’च्या ऑफिससमोरच जनता बँकेची ही नवी शाखा आहे. नेट बँकींग, एटीएम सेवा यांसार‘या अद्ययावत सुविधांसह इतर महत्त्वाच्या बँकिंग सेवाही या शाखेच्या माध्यमातून ग्राहकांना देण्यात येणार आहेत. दरवर्षी पेण मधून गणपती आम्हाला भेटायला पुण्यात येतो यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्हीच गणरायाच्या गावी आलो आहोत. नेहमीप्रमाणेच बाप्पांचा आमच्यावरील आशीर्वाद कायम राहील अशी आम्हाला खात्री आहे.