जनता सहकारी बँकेचे वाढते बळ!
             Date:

    चौंडेश्‍वरी बँकेचे जनता बँकेत विलिनीकरण...

    काम संघटित असेल तर त्याचे यशही मोठे असते. वैयक्तिक कामानेही यश प्राप्त करता येते परंतु त्याला नेहमीच मर्यादा असतात. हेच काम अनेकांनी मिळून केल्यास ते उद्दिष्टापर्यंत पोहचण्याच समर्थ ठरू शकते. याच धर्तीवर आधारित इचलकरंजी येथील चौंडेश्‍वरी बँकेचे नुकतेच जनता सहकारी बँकेत विलिनीकरण झाले. यामुळे जनता बँकेचे बळ तर वाढलेच परंतु त्याचबरोबर आपल्या उद्दिष्ट्यांच्या दिशेने आता जनता बँक अधिक जोमाने आणि वेगाने प्रवास करेल यात शंका नाही. 

    ‘सहकार्यम् यशोधनम्’ या ब्रीदवाक्यानुसार ‘सहकार’ चळवळ सक्षम करण्यासाठीच्या दिशेने जनता बँकेने हे पाऊल उचलले आहे. बँकेचे बळकटीकरण त्याचबरोबर सहकार क्षेत्राची उन्नती या दोन्ही गोष्टींची यातून सांगड घातली जाणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील मोक्याच्या शहरात असणार्‍या चौंडेश्‍वरी सहकारी बँकेच्या ६ शाखा व एक विस्तारित कक्षांना आता ‘जनता बँक’ म्हणून नवीन ओळख मिळाली आहे. ज्याप्रमाणे जनता बँकेच्या सभासदांना आजपर्यंत आम्ही समाधानकारक आणि अद्ययावत सुविधा देत आलो आहोत त्याचप्रमाणे नव्याने आमच्याशी जोडल्या गेलेल्या सर्व सभासदांनाही आम्ही समाधानी ठेवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू. विविध ठिकाणच्या विलिनीकरणाच्या या प्रक्रियेचा थोडक्यात मांडलेला वृत्तांत

    इचलकरंजी

    इचलकरंजी येथील चौंडेश्‍वरी सहकारी बँकेचे जनता सहकारी बँक लि., पुणे मध्ये विलीनीकरण होऊन जनता बँकेच्या कामकाजास इचलकरंजीत मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. इचलकरंजी (मुख्य शाखा), जवाहरनगर शाखा आणि विस्तारीत कक्ष याठिकाणी जुन्या व नवसभासदांच्या प्रतिसादाने बँकेचे कामकाज सुरु झाले आहे. इचलकरंजी मुख्य शाखेच्या शुभारंभाच्या दिवशी सेवाभारतीचे संचालक श्री. प्रमोदराव मिराशी आणि रा.स्व. संघाचे जिल्हा बौद्धिक प्रमुख श्री. अरविंदराव कुलकर्णी यांच्या हस्ते भारतमातेचे प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी बँकेचे संचालक श्री. किशोरभाई शहा व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयंतराव केतकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

    जवाहरनगर शाखेचा इचलकरंजी येथील रा.स्व. संघाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री. प्रकाशचंद्रजी पहाडिया, सेवाभरतीचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्री. राजेश पवार व बँकेचे संचालक श्री. रामदास वि. शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शाखेचा शुभारंभ करण्यात आला.

    त्याचबरोबर जिल्हा संघचालक श्री. भगतरामजी छाबडा व  सेवाभारतीचे संचालक श्री. श्रीकांतराव प्रभुदेसाई  या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून इचलकरंजी विस्तारीत कक्षाची सुरूवात झाली. 

    कराड

    चौंडेश्‍वरी सहकारी बँक, इचलकरंजीच्या विलिनीकरणामुळे सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये जनता सहकारी बँकेची शाखा सुरू झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सातारा जिल्ह्याचे माजी सरसंघचालक श्री. रामचंद्र (अण्णा) गिजरे यांच्या हस्ते या शाखेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जनता बँकेचे उपमहाव्यवस्थापक श्री. यशवंत ढवळीकर, जनता बँक कराड शाखा व्यवस्थापक श्री. अर्जुन वडतिले आदी मान्यवर उपस्थित होते. 

    सांगली


    चौंडेश्‍वरी सहकारी बँक इचलकरंजी, सांगली शाखेच्या विलिनीकरणाप्रसंगी दांडेकर उद्योग समूहाचे श्री. अरुण दांडेकर, सांगली जिल्हा कार्यवाह श्री. रमेश कोटीभास्कर, चितळे बंधू उद्योगसमूहाचे श्री. गिरीष चितळे, बँकेचे संचालक सुधीर पंडित, बँकेचे सहमहाव्यवस्थापक श्री. दिलीप कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व अद्ययावत सुविधांसह सांगलीतील बँकेचे कामकाज सुरू झाले आहे. 

    गडहिंग्लज

    गडहिंगलज येथील शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बँकेचे संचालक श्री. महेंद्र पवार, मुख्य कचेरीतील उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर साठे, शाखा व्यवस्थापक मंगेश तिरकनाड, भास्कर कामत आदी मान्यवर उपस्थित होते. 

    जयसिंगपूर

    चौंडेश्‍वरी सहकारी बँक इचलकरंजी, सांगली शाखेच्या विलिनीकरणाप्रसंगी बँकेचे संचालक श्री. लक्ष्मण पवार, मुख्यकचेरीमधील उपव्यवस्थापक श्री. आनंद सोहनी व सह महाव्यवस्थापक श्रीधर म्हसकर उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी या शाखेचे सर्वात जुने व प्रतिष्ठित खातेदार दिलीप सारडा, नथमल धारीवाल, दिपेश धारीवाल यांनीही आवर्जुन उपस्थिती लावली होती.