गणरायांच्या सोबतीतील दहा दिवस
             Date:


    गणेशोत्सव हा तुम्हा-आम्हा सर्वांचाच अत्यंत आवडतीचा सण. आपल्यापैकी बहुतांश लोकांच्या घरी गणेशोत्सवाच्या काळात गणराय दहा दिवस वास्तव्यास येतात. आमच्या घराबरोबरच हा बाप्पा जनता बँकेतही वास्तव्यास येतो हे विशेष. सालाबादप्रमाणे यंदाही ‘जनता बँक पुणे कर्मचारी गणेशोत्सव’ मोठ्या थाटात साजरा झाला.

    यंदा बँकेने पुण्यातील प्रसिद्ध ‘विश्रामबाग वाडा’ची प्रतिकृती सजावट म्हणून साकारली होती. आरती, प्रसाद, धार्मिक कार्यक्रम आदींमुळे गणरायाच्या सोबतीमधील दहा दिवस अत्यंत आनंददायी वातावरणात गेले. लाडक्या बाप्पाला निरोप देणे नेहमीप्रमाणेच नकोसे वाटत होते, परंतु पुढच्या वर्षी लवकर येतो असे त्याने आश्वासन दिल्याने आम्ही सर्वांनी त्याला अगदी उत्साहात निरोप दिला.

    गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!!