अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांचा विचार - डॉ. गोविलकर
             Date:


     

    केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत नुकत्याच सादर केलेल्या सन २०१७ -१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात समाजाच्या सर्व स्तरांतील घटकांचा विचार केलेला दिसतो. तसेच जनतेच्या प्रचंड अपेक्षांचे ओझे असताना देखील अर्थमंत्र्यांनी ज्या तरतुदी अर्थसंकल्पाद्वारे मांडल्या, त्यांचा विचार करता हा अर्थसंकल्प वित्तीय शहाणपण दाखविणारा होता, असे मत अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी येथे व्यक्त केले. 

     

    जनता सहकारी बँक लि. पुणे आणि 'प्रबोधन मंच, पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने 'केंद्रीय अर्थसंकल्प २०१७' या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. गोविलकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष  रवींद्र मराठे होते. या वेळी जनता बँकेचे अध्यक्ष अरविंद खळदकर यांनी श्री. मराठे यांचा सत्कार केला. मंचाचे उपाध्यक्ष किशोर शशितल यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पुणेकर उपस्थित होते.