Date: |
सौ. कुलकर्णी यांनी या कार्यक्रमातून ‘वर्क कल्चर’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी ग्राहकसेवा, कार्यपद्धती आणि कार्यसंस्कृती, सकारात्मकता, ड्रेसिंग स्टाईल, सहकार्यांशी संवादात मोकळेपणा, गॉसिप फ्री कल्चर, ग्राहक-बँक हितसंबंध इत्यादींबाबत उदाहरण देऊन अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या. या वेळी बँकेचे कार्याध्यक्ष श्री. अरविंद खळदकर, उपाध्यक्ष श्री. संजय लेले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयंत काकतकर आदी मान्यवर उपस्थित होते.