गुंतवणुकीबाबत जनजागृती
             Date:


     यामध्ये दिवसभर झालेल्या कार्यक्रमात बँकेच्या मुख्य कार्यालयात येणार्या प्रत्येक ग्राहकास गुंतवणुकीबाबत माहिती दिली गेली. यामध्ये ‘रेलिगेअर हेल्थ इन्शुरन्स’, ‘मॅक्स न्यूयॉर्क लाईफ इन्शुरन्स कं.’ व ‘एलआयसी म्युअचल फंड’ या नामवंत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी खातेदारांना मार्गदर्शन केले. 

    याच दिवशी सायंकाळी उद्यान प्रसाद मंगल कार्यालय येथे ‘गुंतवणूक मेळावा’ घेण्यात आला. या मेळ्याव्यातून बँकेच्या ऑडिटर सौ. ऋता चितळे यांनी उपस्थितांना गुंतवणुकीबाबत सल्ला व मार्गदर्शन केले. या वेळी बँकेचे संचालक श्री. सुधीर पंडित, साहाय्यक महाव्यवस्थापक श्री. दिलीप कुलकर्णी, उपमहाव्यवस्थापक सुनील कामत आदी मान्यवर उपस्थित होते.