शाखा सेवकांचे एकत्रीकरण
             Date:


    या वेळी नोटाबंदी व त्या कालावधीत आलेल्या अनुभवांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. या वेळी बँकेचे कार्याध्यक्ष श्री. अरविंद खळदकर, उपाध्यक्ष श्री. सजंय लेले, संचालक श्री. लक्ष्मण पवार, संचालिका सौ. मधुरा कसबेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयंत काकतकर, महाव्यवस्थापक श्री. बापट यांची प्रमुख उपस्थिती होती. 

    श्री. संजय चतुर (टिळक रोड शाखा), श्री. अनिल पंचवाघ (शनिवार-नारायण शाखा) व श्री. केतन भगत (भवानी पेठ शाखा) यांनी आपले अनुभव या वेळी सांगितले. त्यानंतर श्री. काकतकर यांनी नोटाबंदीमुळे बँकेतील व्यवहारांवर झालेल्या चांगल्या वाईट परिणामांची माहिती या कार्यक्रमातून दिली. शेवटच्या सत्रात श्री. खळदकर यांनी या काळात सेवकांनी केलेल्या कामाचे, सहकार्याचे कौतुक करून नवीन आव्हाने पेलण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन सर्वांना केले. ग्राहक पेठेचे श्री. सूर्यकांत पाठक यांनीही नोटाबंदीच्या काळात जनता बँकेच्या टिळक रोड शाखेतून ग्राहकांना मिळालेल्या सेवेबद्दल गौरवोद्गार काढले.