Date: |
सध्या पूर्वी सारखं राहीलेलं नाही. करिअरच्या अनेको वाटा निर्माण झाल्या आहेत. पण तरीदेखील विद्यार्थ्यांच्या मनात अखेरपर्यंत संभ्रमाची अवस्था ही असतेच. नेमकं कुठल्या दिशेला जायचं, कशात करिअर करायचं असे प्रश्न असतातच पण त्याही पेक्षा मोठा प्रश्न असतो तो आर्थिक गणितांचा. आता प्रत्येक क्षेत्रातील कोर्सेसची फी इतकी वाढली आहे की, केवळ त्या कारणासाठी देखील ‘त्या’ दिशेला न जाण्याचा सल्ला पालक विद्यार्थ्यांना देत असतात.
खरतर सध्याचा काळ हा तरूणांच्या इच्छा आकांक्षांना मोकळीक देण्याचा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पक विचार करण्याचा आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करिअर करायचं असतं तर दुसरीकडे पालकांची सुद्धा आर्थिक कुचंबणा होत असल्याने त्यांना नको असताना सुद्धा मुलांना नकार द्यावा लागतो. याच समस्येचा सुवर्णमध्य काढत जनता सहकारी बँकेतर्फे ‘एज्युफ्लेक्स’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश ऐवढाच आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेता यावं आणि त्याचबरोबर पालकांची देखील कुचंबणा कुठेही होऊ नये.
आता तुम्हाला केवळ तुमचं ध्येय निश्चित करायचं आहे. तुमच्या ध्येयपूर्तीसाठी जे पाठबळ लागेल ते आम्ही तुम्हाला देऊच. शैक्षणिक कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण करणं यात कोणताही कमी पणा बाळगणं किंवा आपल्या डोक्यावर फार मोठं ओझ असल्यासारख वाटण्याचं कारण नाही. कारण केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगभरात अनेक मोठ्या लोकांनी कर्ज घेऊनच आपले शिक्षण पूर्ण केले आहे व आज ते एका मोठ्या हुद्द्यावर आहेत. अगदीच उदाहरण देऊन बोलायचं झालं तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील शैक्षणिक कर्ज घेतले होते व त्याच माध्यमातून ते पुढे आले. पण मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं करून दाखविलं.