६७ व्या वर्धापनदिनी ६७ व्या शाखेचा (हडपसर) दिमाखात शुभारंभ!

19 Oct 2016 16:47:00
जनता सहकारी बँकेच्या हडपसर येथील ६७ व्या शाखेचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री. बिरू खोमण, श्री. अरविंद खळदकर, श्री. संजय लेले, श्री. लक्ष्मण पवार, श्री. जयंत काकतकर, श्री. सुरेश पराड उपस्थित होते. 

जनता सहकारी बँकेच्या ६७ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून बँकेच्या ६७व्या शाखेचे हडपसर येथे १८ ऑक्टोबर २०१६ रोजी मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले. महाराष्ट्राचे सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. दिलीप कांबळे व पांडुरंग तथा अण्णासाहेब राऊत यांच्या हस्ते शाखेचा व ‘एटीएम’ केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री. अरविंद खळदकर, उपाध्यक्ष श्री. संजय लेले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयंत काकतकर व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. 

राज्यमंत्री श्री. कांबळे म्हणाले, “सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक म्हणून जनता सहकारी बँक ओळखली जाते. हडपसर परिसरातील नागरिकांना या शाखेच्या माध्यमातून अत्याधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.’’

रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाच्या सुचनेनुसार ग्रामीण भागातील लोकांना बँकिंग सेवा-सुविधा त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्यासाठी जनता बँकेने आजच्या वर्धापनदिनानिमित्त बँकेच्या मराठवाड्यातील लातूर आणि कोकणातील पावस या शाखांच्या माध्यमातून दोन ‘बिझनेस करस्पाँडंट’ची नेमणूक केली आहे. हे ‘बिझनेस करस्पाँडंट’ टॅब बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या घरी जाऊन करंट आणि सेव्हिंग खात्याशी संबंधित व्यवहार करणार आहेत. याचबरोबर अन्य बँकिंग सेवा देखील या उपक्रमाद्वारे ग्राहकांना दिल्या जाणार आहेत. 

Powered By Sangraha 9.0