कार लोन मेळावा : आढावा स्वप्नपूर्तीचा...

19 Oct 2016 16:49:00

३४ कुटुंबीयांचे हक्काच्या कारचे स्वप्न साकार!


जनता सहकारी बँकेतर्फे ८ व ९ ऑक्टोबर २०१६ रोजी पुण्यातील न्यायमूर्ती रानडे बालक मंदिरात भव्य कार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल ३४ कुटुंबीयांनी आपले स्वत:च्या कारचे स्वप्न साकार केले असून १२६ ग्राहकांना ऑफर लेटरही देण्यात आले आहे. या मेळाव्यात मारूती सुझुकी, ह्युंडाई, स्कोडा, टोयोटा, टाटा, फोक्सवॅगन आदी नामवंत कंपन्यांच्या आलिशान गाड्या सादर करण्यात आल्या होत्या. मेळाव्याच्या ठिकाणी ‘लकी ड्रॉ’ देखील ठेवण्यात आला होता. यामधील भाग्यवान विजेत्यांना बँकेतर्फे विशेष भेट देण्यात आली. 

शनिवार-रविवार सुट्टीचा दिवस असल्याने या मेळाव्याला पुण्याबरोबरच बाहेरगावावरून आलेल्या पाचशेहून अधिक ग्राहकांनीही भेट दिली. `कार लोन`वर बँकेने विशेष सवलत जाहीर केल्याने अनेकांनी या संधींचा फायदा घेत दसरा-दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या कारचे स्वप्न पूर्ण केले. 

मेळावा जरी दोन दिवस असला तरी ‘माय ड्रीम कार’ ही जनता बँकेची विशेष योजना जानेवारी २०१७ पर्यंत लागू आहे. या योजनेंतर्गत कारचे स्वप्न पूर्ण करण्याची अजूनही ग्राहकांना नामी संधी आहे. या योजनेचा लाभ घेऊन येणार्‍या दिवाळीचा आनंद द्विगुणीत करा!!!

Powered By Sangraha 9.0