जनता बँक झाली ६७ वर्षांची!

19 Oct 2016 16:36:00


समाजातील दुर्बल घटकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने १८ ऑक्टोबर १९४९ रोजी जनता सहकारी बँकेची स्थापना झाली. ‘छोट्या लोकांची मोठी बँक’ म्हणून गेल्या सहा दशकांहून अधिक काळ राज्याच्या सहकार क्षेत्रात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केलेली बँक म्हणून आज जनता सहकारी बँकेची जनमानसात ओळख आहे.
सन १९८८ मध्ये बँकेला शेड्युल्ड दर्जा प्राप्त झाला तर मार्च २०१२ साली बँक मल्टिस्टेट म्हणून ओळखली जाऊ लागली. सहकार क्षेत्रातील आघाडीची बँक म्हणून जनता सहकारी बँकेने आपला नावलौकिक निर्माण केला आहे. आजमितीस बँकेच्या महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात ६७ शाखा कार्यरत असून बँकेची एकूण उलाढाल रुपये १३ हजार २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे १८ ऑक्टोबर २०१६ रोजी जनता बँकेला ६७ वर्षे पूर्ण झाली असून याच दिवशी बँकेच्या ६७ व्या शाखेचा पुण्यातील हडपसर परिसरात शुभारंभ झाला. 

Powered By Sangraha 9.0