जनता सहकारी बँकेच्या सर्व ग्राहकांना अद्ययावत सुविधा देण्याच्या उद्देशाने बँकेने ‘जनता बँक मोबाईल अॅप’ तयार केले असून ते ‘गुगल प्ले स्टोअर’वर मोफत उपलब्ध आहे. अँड्रॉईड व्हर्जन असणार्या सर्व स्मार्टफोन धारकांना हे अॅप वापरता येणार आहे. एका क्लिक वर बसल्याजागी तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याची संधी या अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे...
जनता बँक मोबाईल अॅपद्वारे मिळणार्या सेवा
- खात्याची माहिती
- मिनी स्टेटमेंट
- फंड ट्रान्सफर
- बील पेमेंट
- डिपॉझिट तसेच लोन अकाऊंटची माहिती
- चेक बुक रिक्वेस्ट
- स्टॉप चेक पेयमेंट
- न्यू अकाटंऊ ओपनिंग, आदी...
हल्ली रोखीच्या व्यवहारांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. एकमेकांना पैसे देतानाही ऑनलाईन व्यवहार केला जातो. हीच गोष्ट लक्षात घेऊन बँकेने या अॅपमध्ये ‘फंड ट्रान्सफर’ची सोय उपलब्ध करून दिली आहे. जनता सहकारी बँकेच्या एका शाखेतील खात्यातून दुसर्या शाखेतील खात्यात पैसे पाठविणे या अॅपमुळे अतिशय सोपे झाले आहे. याशिवाय दुसर्या बँकेच्या शाखांमध्ये ‘आरटीजीएस’, ‘एनईएफटी’ व ‘आयएमपीएस’च्या सहाय्याने पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. तसेच वीज, गॅस, टेलिफोन, पोस्टपेड मोबाईल आदिंचे बील भरण्यासाठी आता रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. या बीलांचा भरणाही जनता बँकेच्या अॅपमधून करता येणे शक्य आहे. याशिवाय ‘डीटीएच’ व प्रिपेड मोबाईलचे रिचार्जही जनता बँकेच्या अॅपवरून होऊ शकतं.
तुमच्या प्रतिक्रियांचे स्वागत...
जनता सहकारी बँकेचे मोबाईल अॅप तुम्हाला हाताळताना कसा अनुभव आला, ते वापरण्यासा सोयीचे आहे की ते अधिक सोपे असायला हवे, किंवा यामध्ये तुम्हाला आणखी काही सेवा अपेक्षित आहेत का..? या व अशा स्वरूपाच्या या अॅप बाबतच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला feedback@janatabankpune.com या मेल आयडीवर कळवू शकता. आम्ही तुमच्या सुचनांचा नक्की विचार करू.
ऑनलाईन कोणताही व्यवहार करायचा म्हटला की आपल्याला पहिला प्रश्न पडतो की, हा व्यवहार कितपत सुरक्षित आहे? पण बँकेच्या या मोबाईल अॅप वरून केलेला प्रत्येक व्यवहार अत्यंत सुरक्षित असून त्यासाठी ‘एसएसएल सर्टिफिकेट’ व ‘फायरवॉल’सारखी अनेक सेक्युरिटी लेयर्स यासाठी तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे निश्चिंत होऊन व्यवहार करा आणि अद्ययावत सुविधेचा एक भाग व्हा! दिवाळीचे चार-पाच दिवस बँकेला सुट्टी असली तरीही या अॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सर्व आर्थिक व्यवहार सुलभरित्या पार पाडू शकता. यामुळे तुम्ही अधिक डिजिटल व्हाल आणि त्यातुन डिजिटल दिवाळी सेलिब्रेट केल्याचा आनंदही तुम्हाला मिळेल.