‘डीडी’च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

29 Oct 2016 15:40:00

दीपावली या सर्वात मोठ्या सणाचे उत्साही वातावरण सर्वत्र पसरले आहे. एकमेकांना शुभेच्छा देऊन, भेटीगाठी घेऊन आपण ही दिवाळी मोठ्या आनंदात साजरी करत आहोत. याच पार्श्‍वभूमीवर आम्ही देखील तुमच्याशी एका वेगळ्या संकल्पनेतून संवाद साधणार आहोत. तुम्हा सर्वांना जनता सहकारी बँक लिमिटेड, पुणे तर्फे ‘डीडी’च्या हार्दिक शुभेच्छा!

आता हे ‘डीडी’ काय आहे, असा प्रश्‍न तुम्हाला नक्कीच पडला असणार. तर त्याच उत्तर अगदीच सोपयं हो... ‘डीडी’ म्हणजे डिजिटल दिवाळी! यंदाची दिवाळी आपण अधिक डिजिटल होऊन `सेलिब्रेट` करूयात...

जनता सहकारी बँकेचे मूळ तत्त्वच हे आहे की, “आपल्या विचारांशी एकरूप राहात मात्र त्याच वेळी आधुनिकतेचीही कास धरीत ग्राहकांना सेवा देणे’’ याच तत्वांच्या आधारे नुकतेच आम्ही बँकेचे मोबाईल अ‍ॅप सुरू केले असून तुम्हा खातेदारांनीही त्याला अल्पावधीतच भरघोस प्रतिसाद दिला आहे. दिवाळीच्या या सण-उत्सवात बँकेच्या या मोबाईल अ‍ॅपचा तुम्हाला अधिक वापर होईल, त्या दृष्टीने आम्ही तुम्हाला डिजिटल दिवाळीच्या शुभेच्छा देत आहोत.

सोबतच बँकेचे फेसबुक पेजही असून त्यामाध्यमातूनही आम्ही तुमच्याशी संपर्कात असतो. एकीकडे लाडू, चिवडा, चकल्यांचा खमंग फराळ आणि दुसरीकडे जनता बँक मोबाईल अ‍ॅप व फेसबुकच्या माध्यमातून मिळणारा चटपटीत डिजिटल फराळ हे कॉम्बिनेशन अत्यंत मस्त जमून येईल...यंदा हे आजमावूनच बघा....

Powered By Sangraha 9.0