जनता बँकेतर्फे पुणे विद्यार्थी गृहातील गरजू विद्यार्थांना दिवाळी भेट

29 Oct 2016 15:45:00

पुणे - जनता सहकारी बँक लि. पुणेच टिळक रोड शाखेचे ’खातेदार-सेवक स्नेह मंडळा’च वतीने आज वसुबारसेच निमित्ताने पुणे विद्यार्थी गृहातील महाराष्ट्र विद्यालात शिक्षण घेणार ५५ अनाथ, गरजू व होतकरू विद्यार्थंना नवीन कपडे व फराळांच्या पदार्थांचे वाटप करणत आले.

या प्रसंगी जनता बँकेचे संचालक सुधीर पंडित, प्रभारी ’मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर, टिळक रोड शाखेचे शाखा व्यवस्थापक राजीव बर्वे,  शाळेचे मुख्याध्यापक डॉ. टी. आर. गोराणे, बँकेचे पदाधिकारी रवींद्र धुमाळ, कर्मचारी, खातेदार आदी ’मान्यवर उपस्थित होते.
जनता बँकेच्या टिळक रोड शाखेतील खातेदार, ग्राहक व कर्मचाऱ्यांनी एकत्रित जमा केलेल्या निधीमधून या विद्यार्थ्यांना नवीन कपडे व फराळाच पदार्थांचे वाटप करण्यात आले. दिवाळीनिमित्त सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून  अशाप्रकारचा कार्यक्रम बँकेच वतीने आोजित करण्यात आला.

जनता सहकारी बँकेच्या सध्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात ६७ शाखा असून या सर्व शाखा अतिशय मोक्याच्या ठिकाणी कार्यरत आहेत. बँकेची सध्याची एकूण उलाढाल रुपये १३ हजार २०० कोटींपेक्षा अधिक आहे.

Powered By Sangraha 9.0