जनता बँक @ ‘एफबी’

29 Oct 2016 15:44:00

सध्या सोशल मीडियाचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. हा वापर करताना एखाद्या शब्दाचा शॉर्टफॉर्म वापरण्याची प्रथा अत्यंत सहजपणे येथे रूजली आहे. उदाहरणच द्यायचं झाल्यास फेसबुकला छोटं करून ‘एफबी’ असे संबोधले जाते. तर सांगायचा मुद्दा असा की जनता सहकारी बँक देखील ‘एफबी’वर उपलब्ध असून या माध्यमातूनही आम्ही तुमच्या पर्यंत पोहचण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो. दीपावलीच्या या काळातही आम्ही ‘एफबी’वर अ‍ॅक्टिव्ह असून शुभेच्छा असो किंवा आमचे काही महत्त्वपूर्ण उपक्रम घेऊन आम्ही आपल्या समोर येणार आहोत.  आजमितीला जनता बँकेच्या फेसबुक पेजला एक लाख ११ हजाराहून अधिक नेटीझन्स नी ‘लाईक’ केले आहे. त्यात आपली रूची दाखविली आहे. ते नेहमी या फेसबुक पेजला भेट देतात. याचाच अर्थ असा की जनता बँकेच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उपक्रमांची माहिती प्रत्येक दिवशी एक लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहचत असते. तुम्ही बँकेचे ‘एफबी’ पेज ‘लाईक’ केले असतील तर अतिशय उत्तम पण अजूनही केले नसेल तर लगेचच https://www.facebook.com/JanataSahakariBank/?fref=ts 
या लिंकवर क्लिक करा आणि जनता बँकेचे पेज ‘लाईक’ करा... लाईक करताना ‘नोटिफिकेशन्स’ ऑन करायला विसरू नका. यामुळे तुम्ही सोशली जनता बँकेच्या अधिक जवळ येऊ शकता...

इंटरनेटच्या माध्यमातून जग अतिशय वेगाने पुढे जात आहे. या वेगाची काही अंशी बरोबरी करण्याचा जनता सहकारी बँक प्रयत्न करीत आहे. याचदृष्टीने ऑनलाईन व्यवहारासाठी व बँकेच्या उपक्रमांची माहिती आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही अ‍ॅप व फेसबुक पेजद्वारे आपल्यापर्यंत पोहचत असतो. या इंटरनेटच्या युगात दर सेंकदाला किती हालचाली होतात याबाबतची अत्यंत कमी वेळात अचूक माहिती देणारा खालील व्हिडिओ तुम्ही एकदा तरी पाहाच... 
https://www.youtube.com/watch?v=uutTs4USZ74

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नेमके लक्षात येईल की, इंटरनेटच्या या वेगवान युगात तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला नेमकं कुठे पोहचायचयं... 

यंदाची दिवाळी डिजिटल दिवाळी म्हणून साजरी करून इंटरनेटच्या वेगवान युगात तुम्हीही मोठ्या उत्साहाने सहभागी व्हा... पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना ‘डीडी’च्या लाखो शुभेच्छा!!!

 

Powered By Sangraha 9.0