ग्राहक, खातेदारांनी संयम बाळगावा

17 Nov 2016 16:26:00

जनता बँकेचे अध्यक्ष मा. खळदकर यांचे खातेदारांना आवाहन

​भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठवड्यात देशहिताच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार सध्या चलनात असलेल्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या असून, त्याऐवजी पाचशे व दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा ​चलनात आणल्या जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांमध्ये एक प्रकारचे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु नागरिकांनी आणि विशेषत: जनता सहकारी बँकेच्या ​ग्राहक व ​खातेदारांनी कोणत्याही प्रकारे गोंधळून न जाता या परिस्थितीत काही काळ संयम बाळगण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मा. श्री. अरविंद खळदकर यांनी केले आहे. 

​श्री. खळदकर म्हणाले, की 'जनता बँकेच्या खातेदारांनी भ्रमात किंवा कल्पनाविश्‍वात न राहता या बदलाकडे सकारात्मक पद्धतीने पाहणे आवश्यक आहे. नोटा बदलण्याच्या प्रक्रियेबाबत थोडा विलंब होत असेलही. पण भारतीय रिझर्व्ह बँकेने ​घालून दिलेल्या नियमावलीनुसार कोणत्याही खातेदाराचे पैसे बुडणार नाहीत, प्रत्येकाला प्रत्येकाच्या वाट्याचे पैसे दिले जाणार आहेत. भारतीय ​रिझर्व्ह बँकेने रोख भरणा किंवा पैसे काढण्यावर जे निर्बंध आज घातले आहेत त्यामध्येही कालांतराने बदल हो​तील आणि देशाची अर्थव्यवस्था पुन्हा मूळ पदावर येईल. खातेदारांनी केवळ संयम बाळगावा, तसेच घाईगडबड न करता व्यवहार करण्याची आवश्यकता आहे.'

Powered By Sangraha 9.0