सहकार क्षेत्रातील दैदिप्यमान वाटचालीत जनता सहकारी बँकेने अनेक चढउतारांचा सामना केला आहे. नव्हे त्यातून तावून- सुलाखून ही संस्था यशस्वीपणे बाहेर पडली. ग्राहकांनी व्यक्त केलेला विश्वास व आपणा सर्वांनी दिलेल्या बळावरच या आव्हानांचा यशस्वीरित्या सामना बँकेने केला. या चढउतारात आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आमचे असंख्य सन्माननीय ग्राहक हेच आमचे खरे बलस्थान आहे.
येत्या २५ मे २०१६ रोजी बँकेच्या अहमदनगर आणि गोरेगाव (मुंबई) येथे नव्या दोन शाखांची सुरवात होते आहे. त्या पार्श्वभूमीवर आमच्या सन्माननीय ग्राहकांनी आमच्या प्रती व्यक्त केलेली ही प्रातिनिधिक भावना. अशा भावनांबद्दल आम्ही सर्व सन्माननीय ग्राहकांचे ऋणी आहोत.