विश्वास सार्थकी लागला

24 May 2016 11:53:00


केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनांचा सामान्यांना लाभ मिळत नाही असा नेहमीचा अनुभव आणि जरी मिळाला तरी त्यासाठी अनेक खस्ता सहन कराव्या लागतात, अशा तक्रारी आजपर्यंत आपण अनेक वेळा ऐकल्या आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि त्याकरिता काम करणार्‍या वित्तसंस्था सध्या याला अपवाद ठरत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 



केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘पंतप्रधान जीवन ज्योती बिमा योजने’अंतर्गत ओतूर येथील शेतकरी जयदीप राम रावत यांनी जनता सहकारी बँकेतील खात्याव्दारे विमा उतरविला होता. दुर्देवाने जयदीप रावत यांचे अकस्मात निधन झाले व या योजनेंतर्गत मिळणारी दोन लाख रूपये विम्याची रक्कम कै. रावत यांच्या पत्नी विशाखा रावत यांना धनादेशाव्दारे नुकतीच देण्यात आली. पतीच्या निधनानंतर कोणत्याही एजंटशिवाय आवश्यक कागदपत्रे श्रीमती विशाखा रावत यांनी जनता सहकारी बँकेत सादर केली आणि काही दिवसातच रावत यांच्या खात्यात केंद्र सरकारमार्फत ही रक्कम जमा झाली. सरकार तसेच जनता सहकारी बँकेवर दाखविलेला विश्‍वास अशाच घटनांमधून वृद्धींगत होत आलेला आहे. यापुढेही तो असा वृद्धींगत होत जाईल

Powered By Sangraha 9.0