`शिक्षण सर्वांसाठी..!`- जनता एज्युफ्लेक्स कर्ज योजना

30 Jun 2016 14:34:00


सर्वांसाठी घर याचप्रमाणे सर्वांसाठी शिक्षण या धर्तीवर शिक्षणाच्या प्रसारासाठी विविध स्तरावर काम करण्याची आवश्यकता आहे. याच योजनेच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून जनता सहकारी बँकेतर्फे विद्यार्थ्यांना ‘एज्युफ्लेक्स’ योजनेंतर्गत शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी कर्ज देण्यात येत आहे. दहावी किंवा बारावीनंतर मान्यताप्राप्त संस्थेमध्ये विशिष्ठ अभ्यासक्रम, पदवी, पदविकेसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेद्वारे शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये केवळ `कॉलेज फी`चाच समावेश नसतो तर त्याचबरोबर `हॉस्टेल फी`, संगणक व इतर साहित्य आदी खर्चांचाही विचार केला जातो.

कॉमर्स, आर्टस् आणि सायन्स या शाखांशिवाय आता शिक्षणाच्या अनेकविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीनिवडीनुसार तो त्या शिक्षणाला प्राधान्य देताना दिसतो. त्या क्षेत्रातील करिअरमध्ये आघाडी घेताना दिसतो आहे. परंतु अनेकदा महाविद्यालयीन किंवा उच्चशिक्षण घेताना विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांची हीच अडचण सोडविण्यासाठी ‘एज्युफ्लेक्स’ ही योजना आहे. या योजनेंतर्गत देशांतर्गत शिक्षणसाठी १० लाख रूपये तर परदेशी शिक्षणासाठी २० लाख रूपये कर्ज १०  वर्षांच्या मुदतीसाठी दिले जाते. यातही ४ लाख रूपयांपर्यतच्या कर्जाला जामीनदाराची गरज नसते परंतु ४ लाखांपेक्षा अधिक कर्ज घेणार असाल तर एक जामीनदार आवश्यक आहे. स्थावर मालमत्ता, सोने आदी स्वरूपातील तारण व्यवस्थाही उपलब्ध आहे. जनता बँकेतर्फे हे शैक्षणिक कर्ज ११.५० टक्के व्याजदराने विद्यार्थ्यांना दिले जाते.

या योजनेत विद्यार्थी किंवा पालकाने (ज्याच्या नावे कर्ज असेल त्याने) अभ्यासक्रमाचा कालावधी व सहा महिन्याच्या ड्राय पिरियडसह एकूण दहा वर्षात कर्जाची रक्कम व्याजासह परत करणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या योजनेत विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकाराचा दुरावा (मार्जिन मनी) भरणे अपेक्षित नाही.

आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी ‘एज्युफ्लेक्स’चा लाभ घेऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रातील शिक्षण पूर्ण करून पुढील आयुष्य उज्ज्वल बनविले आहे. अगदी सोप्या पद्धतीने व कमी वेळात तुम्हाला हे कर्ज उपलब्ध होऊ शकते, मग आता वाट कसली पाहाताय...आपल्या जवळील जनता बँकेच्या शाखेला भेट द्या आणि तुमच्या पसंतीच्या शिक्षण क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य घडवा.

Powered By Sangraha 9.0