‘छोट्या लोकांची मोठी बँक’ म्हणून गेल्या सहा दशकाहून अधिक काळ राज्याच्या सहकार क्षेत्रात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केलेली बँक म्हणून पुण्याची जनता सहकारी बँक ओळखली जाते. १८ ऑक्टोबर १९४९ रोजी समाजातील दुर्बल घटकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने जनता बँकेची स्थापना झाली. सन १९८८ मध्ये बँकेस शेड्युल्ड दर्जा प्राप्त झाला तर मार्च २०१२ साली बँक मल्टिस्टेट म्हणून ओळखली जाऊ लागली. सहकार क्षेत्रातील आघाडीची बँक म्हणून जनता सहकारी बँकेने आपला नावलौकिक निर्माण केला आहे. आजमितीस बँकेच्या महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात ६६ शाखा कार्यरत असून बँकेची एकूण उलाढाल रुपये १२ हजार ९०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. देशाच्या सहकारी बँकिंग क्षेत्रातील पहिल्या दहा बँकांमध्ये जनता बँकेची गणना होते. सहकारातील सहकार या तत्त्वानुसार जनता बँकेने १९७६ मध्ये कोकणातील रत्नागिरी को-ऑप. बँकेचे यशस्वी विलिनीकरण करून घेतले आणि विलिनीकरणाचा पायंडा पाडला.
सहकारी बँकिंग क्षेत्रात आघाडीवर असणार्याण पुण्यातील जनता सहकारी बँकेत इचलकरंजी येथील चौंडेश्वकरी सहकारी बँक नुकतीच विलीन करण्यात आली. या दोन्ही बँकांचा विलिनीकरण समारंभ २७ ऑगस्ट २०१६ रोजी इचलकरंजी येथील श्रीमंत नारायणराव बा. घोरपडे नाट्यगृह येथे पार पडला.
आधुनिकतेची कास धरणार्या जनता सहकारी बँकेने बँकिंग संबंधीच्या सर्व सेवा सुविधा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी खास मोबाईल बँकिंग सेवा प्रणाली तयार केली आहे. या सुविधेमुळे जनता बँकेच्या महाराष्ट्र व गुजरात मधील सर्व ६६ शाखांमधील ग्राहकांना २४ तास आणि ३६५ दिवस मोबाईलच्या एका क्लिकवर आपल्या खात्यावरील शिल्लक पाहणे, मुदतठेव खाते उघडणे, स्वत:च्या अन्य बँकांच्या खात्यांमध्ये हस्तांतरण करणे, मोबाईल, केबल टी.व्ही रिचार्ज, वीज, विमा, दूरध्वनी इ. देयकांचा भरणा करणे सहज शक्य होणार आहे. या सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. या सेवेसंबंधीची अधिक माहिती जनता बँकेच्या शाखेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आधुनिक सेवेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा.
बँकिंग क्षेत्रात गेल्या काही वर्षांत आमुलाग्र बदल झाले. आधुनिकतेची कास धरून सर्वच क्षेत्रातील बँकांनी आपल्या शाखांचे जाळे देशाच्या ग्रामीण भागापर्यंत पसरविले. जनता सहकारी बँकेने देखील बँकिंग क्षेत्रातील आधुनिकता आत्मसात करून आपल्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एनिवेअर बँकिंग, कोअर बँकिंग, डीमॅट, विमा, ’आरटीजीएस, नेफ्ट’ यासारख्या अत्याधुनिक बँकिंग सेवा अतिशय अल्प दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. बँकेने आपले स्वत:चे अत्याधुनिक डेटा सेंटर उभारले असून या डेटा सेंटरचा उपयोग सध्या राज्यातील अन्य लहान सहकारी बँकादेखील करून घेत आहेत.
सहकार क्षेत्राच्या आणि जनता सहकारी बँकेच्या इतिहासात सोमवार दिनांक १५ फेब्रुवारी २०१६ हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. या दिवशी जनता सहकारी बँकेच्या ’अमृतकलश’ या ठेव योजनेत केवळ एका दिवसात शंभर कोटी रुपये जमा झाले. बँकेच्या ग्राहक, सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांनी बँकेवर असलेले आपले अपार प्रेम आणि विश्वाृस दाखवून दिला. रिझर्व्ह बँकेने जनता सहकारी बँकेला ‘टियर टू कॅपिटल’ साठी ’अमृतकलश’ या ’लाँग टर्म डिपॉझिट’ (एलटीडी) या योजनेद्वारे रुपये शंभर कोटी जमा करण्यास परवानगी दिली होती. यानुसार ग्राहकांनी ’अमृतकलश’ योजनेत रुपये शंभर कोटी जमा करून एक नवा इतिहासच घडविला. गेल्या काही वर्षात सहकारी बँकिंग विश्वारला तडे जात असताना ’अमृतकलश’ योजनेच्या माध्यमातून जनता सहकारी बँकेवर ग्राहक, ठेवीदार, सभासद, हितचिंतक यांनी जो विश्वा स दाखविला त्यामुळे सहकारी बँकिंग चळवळ आणखी बळकट होण्यास नक्कीच मदत होणार आहे.
जनता सहकारी बँक पुणे ही आर्थिकदृष्ट्या सक्षम बँक असून बँकेने यापूर्वी मुंबईतील पुना को-ऑप बँक, गुजरातमधील खेडब्रम्हा आणि कोकणातील रत्नागिरी को-ऑप बँक या बँकांचे यशस्वी विलिनीकरण करुन घेतले आहे. जनता बँकेत विलीन होणारी चौंडेश्वपरी बँक ही चौथी बँक आहे. ग्राहकांशी असणारी आपुलकी, जिव्हाळा तसेच आधुनिक बँकिंग यांचा योग्य समन्वय साधल्यामुळेच जनता सहकारी बँकेचा आलेख उंचावत आहे. आगामी काळातदेखील शाखा विस्ताराच्या माध्यमातून तसेच खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँका देत असलेल्या आधुनिक सेवा सुविधा जनता सहकारी बँकेच्या ग्राहकांना अल्प दरात उपलब्ध करून देण्याचा जनता बँकेच्या संचालक मंडळाचा तसेच व्यवस्थापनाचा मानस आहे. जनता सहकारी बँकेवर असणारे ग्राहकांचे अपार प्रेम आणि विश्वा्स भविष्य काळात असाच दृढ राहील यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.