शाखा वृत्तांत

04 Aug 2016 10:25:00

जनता बँकेच्या लातूर शाखेत रक्तदान शिबिर

मराठवाडा आणि त्यातही विशेषत: लातूरमध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासते होती. पाण्याबरोबरच रक्ताची उपलब्धता देखील लातूरमध्ये प्रकर्षाने जाणवणारा प्रश्‍न आहे. या प्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी जनता सहकारी बँक, लातूर शाखेच्यावतीने जुन महिन्यात डॉ. भालचंद्र रक्त पेढीच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. 

सत्यनारायण कर्वा, वैजनाथअप्पा लातूरे, हुकुमशेठ कलंत्री आणि जोगिंदरसिंह बिसेन यांच्या हस्ते डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रतिमेस पुप्षहार अर्पण करून या शिबिराची सुरूवात करण्यात आली. लातूर शाखेतील कर्मचारी व खातेदार मिळून सुमारे १०१ जणांनी यावेळी रक्तदान केले. यामध्ये ‘महाराष्ट्र बायो फर्टिलाअझर्स’ या कंपनीतील ४० कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता. शाखेतील सवेक दीपक महिंद्रकर यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. 

ओतूरच्या विद्यार्थ्यांचा सत्कार

दहावीमध्ये घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा जनता सहकारी बँकेच्या ओतूर शाखेतर्फे नुकताच विशेष सत्कार करण्यात आला. ‘सुगम मराठी व्याकरण व लेखन’ या पुस्तकाचे विद्यार्थ्यांना भेट देऊन गुलाबपुष्प व पेढे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक बाबासाहेब जाधव, शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रा. कुणाल कोरे, शाखा व्यवस्थापक बाळासाहेब जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

चैतन्य विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी अस्वार, उपमुख्याध्यापक पी. जे. शिंदे, भाऊसाहेब खोडे, सुभाष मुळे, माणिक वाळेकर, गणेश तांबे, बँकेचे उपशाखा व्यवस्थापक मारूती नवले आदी मान्यवर उपस्थित होते. ओतूर आणि परिसरातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला. 

दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्याची बँकेची वर्षानुवर्षांची ही परंपरा आम्ही यानिमित्ताने जपली असल्याचे बाबासाहेब जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले. 

जीएसटीविषयावर व्याख्यान

जनता सहकारी बँकेच्या टिळकरोड शाखेतर्फे गुडस् सर्व्हिस टॅक्स (जीटीएस) विषयावर चार्टड अकाऊंटन्ट श्री. मुकुंद अभ्यंकर यांचे नुकतेच व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. उद्यान प्रसाद मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी बँकेचे सह महाव्यवस्थापक श्री. डी. जी. कुलकर्णी व श्री. जयंत काकतकर उपस्थित होते. श्री. अभ्यंकर यांनी व्यापारी व खातेदारांसोबत ‘जीटीएस’ विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करून चर्चाही केली. ‘जीएसटी’चे फायदे, तरतुदी आणि त्रुटी याबरोबरच यामधून सरकारला मिळणारे उत्पन्न याविषयीही श्री. अभ्यंकर यांनी उपस्थितांना विस्ताराने माहिती दिली.  

वाहन कर्ज मेळावा

जनता सहकारी बँक, टिळक रोड शाखा व सेहगल ऑटो यांच्या संयुक्त विद्यमाने विजयरथ वाहन कर्ज योजना बँकेच्या शाखेमध्येच आयोजित करण्यात आली होती. सह महाव्यवस्थापक श्री. जयंत काकतकर यांनी यावेळी शाखेत भेट देऊन योजनेची माहिती घेतली तसेच उपस्थित ग्राहक, सदस्यांना या योजनेचे महत्त्व पटवून दिले. या योजनेंतर्गत ग्राहकांना वाहन किमतीच्या ९० टक्के कर्ज सात वर्ष मुदतीसाठी उपलब्ध करून दिले जाते. यासाठी कमीत कमी कागदपत्रे व एक जामीदनार आवश्यक असतो. 

इच्छापत्र विषयावर श्री. बेंद्रे यांचे व्याख्यान

इच्छापत्र सारख्या संवेदनशील विषयाबद्दल अनेकदा उघड-उघड बोलले जात नाही. त्यामुळे यासंदर्भातील अनेक गोष्टींबाबत आपण अनभिज्ञ असतो. त्यामुळे जनता सहकारी बँकेच्या टिळक रोड शाखेने पुढाकार घेऊन ‘इच्छापत्र’ या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. अ‍ॅड. दादासाहेब बेंद्र यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सध्याच्या काळात इच्छापत्र लिहून ठेवणे किती आवश्यक आहे आणि घरगुती वाद कसे टाळता येतात व कायदेशीर बाबी किती सोप्या होतात हे अ‍ॅड. बेंद्रे यांनी यावेळी स्पष्ट केले. श्री. राजीव बर्वे यांनी प्रास्ताविक, श्री. पुजारी यांनी वक्त्यांचा परिचय केला तर श्री. भट यांनी आभार मानले. 

Powered By Sangraha 9.0