महाराष्ट्र राज्यातील मानाचा समजला जाणारा ‘एबीपी माझा सन्मान पुरस्कार २०१६ सोहळा नुकताच मुंबई येथे मोठ्या थाटात पार पडला. जनता सहकारी बँकेने या सोहळ्याचे प्रायोजकत्त्व स्वीकारले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू व प्रसिद्ध अभिनेता अमीर खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जनता बँकेचे श्री. बेडेकर यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सुधीर पटवर्धन, ललिता बाबर, शुभा टोले, हनुमंतराव गायकवाड, महेश काळे, नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू, नाम फाऊंडेशन व पाणी फाऊंडेशन या व्यक्ति आणि संस्थांना ‘माझा सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.