जनता सहकारी बँक, बाजीराव रोड शाखेतर्फे दसरा-दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ग्राहकांना ‘जनता वाहन कर्ज योजना’, ‘जनता गृहकर्ज योजना’, ‘जनता वैयक्तिक कर्ज योजना’ व ‘जनता प्रॉपर्टी मॉर्गेज लोन योजना’ आदींचा लाभ घेता येणार आहे.
या योजनांची माहिती देण्यासाठी बाजीराव रोड शाखेतर्फे वेगळ्या प्रकारचे कॅम्पेन सध्या सुरू आहे. या योजनांची माहिती असणारे आयकार्ड स्वरूपातील फलक शाखेमधील प्रत्येक कर्मचारी, अधिकार्यांच्या गळ्यात दिसत आहे. एवढेच नाही तर या योजनांची माहिती समस्त पुणेकरांना देण्यासाठी शाखेतील कर्मचारी दुपारच्या वेळेत अनोळखी व्यक्तींची भेट घेत आहेत. अशा प्रकारची योजना बँकेतर्फे राबविली जात असून तुम्ही इच्छूक असाल तर आमच्याशी जरूर संपर्क साधा, अशा आशयाचा संवाद पुणेकरांशी साधला जातो आहे.
याशिवाय बाजीराव रोड शाखेमध्ये ठिकठिकाणी या योजनांची माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहेत. तसेच बँकेत प्रवेश केल्यानंतर यासंदर्भात एक विशेष व्यासपीठही तयार करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे शाखेमध्ये एक प्रकारचे उत्साहाचे वातावरण निर्मिाण झाले असून खातेदार, ग्राहकांनाही याचा फायदा होत आहे. हा उपक्रम सुरू झाल्यापासून अनेक खातेदारांनी यापैकी काही योजनांचा लाभ घेतला आहे. ही योजना दिवाळी अखेरपर्यंतच चालू असून अधिकाधिक ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा!