आजच्या युगात आरामदायी आयुष्य जगायला कोणाला आवडणार नाही... प्रत्येकाचीच अशी इच्छा असते की, माझ एक घर असावं, माझ्याकडे कार असावी आणि कुटुंब नेहमी आनंदी असावे. यंदाच्या दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर स्वप्नातली कार घेऊन कुटुंबाचा आनंद द्विगुणीत करण्याची संधी जनता सहकारी बँकेने तुमच्यासाठी आणली आहे. अर्थातच, यासाठी तुम्हाला जनता बँक कार लोन मेळाव्यास भेट द्यावी लागेल...
जनता सहकारी बँक, पुणेतर्फे ८ व ९ ऑक्टोबर २०१६ रोजी शनिवार पेठेतील, नवीन मराठी शाळेच्या मैदानावर भव्य कार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बँकेच्या ‘माय ड्रीम कार’ या योजनेंतर्गत ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या मेळाव्यात नामवंत मोटार कंपन्या सहभागी होणार असून तुमच्या आवडत्या कारचा पर्याय येथून तुम्हाला निवडता येणार आहे. एकाच छताखाली अनेक पर्याय उपलब्ध होणार असल्याने तुलनात्मक अंदाज बांधून तुम्हाला कारबाबतचा लगेचच निर्णय घेणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत ९.८५ टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार असून महिलांसाठी हा व्याजदर ९.७५ टक्के असणार आहे.
दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपल्या स्वत:च्या कारचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी जनता बँक कार मेळाव्याच्या रूपाने तुमच्यापर्यंत चालून आली आहे. त्यामुळे ही संधी न दवडता अधिकाधिक ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबीयांच्या स्वप्नांची पूर्तता करावी!