स्वत:चे घर आणि गाडी हे प्रत्येक मनुष्यप्राण्याचे स्वप्न असते. प्रत्येकाचेच हे स्वप्न पूर्ण होते असे नाही, पण या स्वप्नासाठी धडपड करणार्या, धाडसी निर्णय घेणार्यांसोबत जर जनता सहकारी बँक उभी राहिली, तर हे स्वप्न साकार होण्यास नक्कीच मदत होते. याचा चांगला अनुभव आत्ताच बँकेने घेतलेला एक मेळावा व योजनेमधून दिसून आला. ‘माय ड्रीम कार’ अशी अनोखी योजना बँकेने मागील सहा महिन्यांपासून राबविली. या योजनची सांगता नुकतीच, म्हणजे 15 जानेवारी 2017 रोजी झाली. पण या संपूर्ण कालावधीत या योजनेच्या माध्यमातून अनेक सामान्य ग्राहकांनी आपले स्वत:च्या हक्काच्या चार चाकी गाडीचे स्वप्न पूर्ण केले. विशेष म्हणजे नोटाबंदीच्या निर्णयानंतरही ‘कार लोन’ घेण्यासंदर्भात ग्राहक इच्छूक असल्याचे दिसून आले.
‘माय ड्रीम कार’ योजनेअंतर्गत 9.85 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यातही महिलांसाठी विशेष सवलत देण्यात आली होती. कमी वेळेत निवडक कागदपत्रांच्या आधारे कर्जमंजुरी दिली गेली. या योजनेचा लाभ घेणार्या कर्जदाराला गाडीच्या किमतीमधील केवळ 5 टक्के रक्कम भरायची होती, तर उर्वरित 95 टक्के रक्कम बँकेमार्फत कर्जरूपाने देण्यात आली. या योजनेचाच एक भाग म्हणून ऑक्टोबर 2016 मध्ये जनता बँकेतर्फे ‘न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर’ येथे दोन दिवसीय भव्य कार लोन मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातून अनेकविध प्रकारच्या सवलती देखील ग्राहकांना देण्यात आल्या व त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक कुटुंबांच्या घरी सणांच्या निमित्ताने नवी चार चाकी आली.
आम्ही नेहमीच ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा, नवीन योजना आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. ‘माय ड्रीम कार’ योजनेला केवळ पुण्यातूनच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तुमच्या याच प्रतिसादामुळे पुढील काळात नव्या उमेदीने नवी योजना मांडण्याची प्रेरणा आम्हाला मिळत असते. ‘माय ड्रीम कार’ ही योजना 15 जानेवारी रोजी संपली असली, तरी बँकेच्या कर्ज विभागामार्फत वाहनकर्जे यापुढेही सुरूच राहणार आहेत. तथापि, या योजनेअंतर्गत ज्या सवलती ग्राहकांना दिल्या गेल्या होत्या, त्यांचे प्रमाण मात्र कमी होईल. आमच्या पुढील प्रत्येक योजनेस तुम्ही असाच प्रतिसाद द्याल, अशी आम्हाला अपेक्षा आहे!