मुंबईत जनता सहकारी बँकेचा विस्तार

22 Feb 2017 15:52:00


बदलत्या काळानुरूप अत्याधुनिक बँकिंग सेवा देणार्‍या पुण्यातील जनता सहकारी या मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेच्या कांदिवली (पश्‍चिम), मुंबई शाखेचे उद्घाटन उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते श्री. मनोहरलाल सिंघानिया यांच्या हस्ते दिनांक १७ फेब्रुवारी २०१७ रोजी झाले. त्याचबरोबर एटीएम केंद्राचे उद्घाटन बँकेचे अध्यक्ष श्री. अरविंद खळदकर यांच्या हस्ते करण्यात आले. 
या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष संजय लेले, संचालक मंडळ सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर, अन्य मान्यवर, ग्राहक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मुंबईमध्ये जनता बँकेच्या बोरिवली, घाटकोपर, मुलुंड व गोरेगाव या ठिकाणी शाखा सुरू आहेत. कांदिवलीतील दहाव्या शाखेच्या रूपाने मुंबईतील कामकाजाचा यशस्वी विस्तार झाला आहे. 

या शाखेच्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एनीवेअर बँकिंग, NEFT, RTGS विमा इत्यादींचा समावेश आहे. जनता सहकारी बँकेच्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात सध्या ६८ शाखा कार्यरत असून, बँकेचा आज अखेरचा एकूण व्यवसाय (बिझनेस मिक्स) सुमारे १३ हजार ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. 

Powered By Sangraha 9.0