जनता सहकारी बँकेचा 'कै. वसंतदादा पाटील पुरस्कारा'ने गौरव

22 Feb 2017 15:58:00


दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लि. मुंबईच्या वतीने सन २०१५ -१६ या वर्षासाठीच्या 'कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट शेड्युल्ड नागरी सहकारी बँक पुरस्कारा'ने जनता सहकारी बँक लि. पुणेला नुकतेच सन्मानित करण्यात आले. 

मुंबई येथे झालेल्या एक शानदार समारंभात हा पुरस्कार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते जनता बँकेचे अध्यक्ष अरविंद खळदकर, उपाध्यक्ष संजय लेले, तज्ज्ञ संचालक विजय भावे व मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर यांनी स्वीकारला. 

या प्रसंगी दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लि. मुंबईचे पदाधिकारी, तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0