आम्ही करू तुमच्या घराचे स्वप्न साकार

22 Feb 2017 15:47:00


पुण्यासारख्या विकसित शहरात आपले स्वत:चे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. परंतु या स्वप्नाला नेहमीच योग्य साथ मिळतेच असे नाही. कधी लोकेशन आवडत नाही, तर कधी घर छोटे वाटते. बहुतांश वेळा सगळे चांगले असते, पण किंमत मात्र आवाक्याबाहेर असते आणि विशेष म्हणजे यामुळे सामान्यांना कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. मात्र सध्याचा काळ असा आहे, की सर्वच गोष्टी अतिशय उत्तम प्रकारे जुळून आल्या असून, गृहकर्जाद्वारे तुम्ही तुमचे स्वप्न साकार करू शकता. यासाठी जनता सहकारी बँक सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. 

 नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली. देशातील अर्थव्यवस्थेमध्ये झालेल्या या मोठ्या निर्णयानंतर अर्थतज्ज्ञांकडून अनेक मत-मतांतरे व्यक्त झाली. पण नोटाबंदीनंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जो अर्थसंकल्प सादर केला आहे, त्यातून प्रत्येक क्षेत्राला काही ना काहीतरी देण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. विशेषत: `रिअल इस्टेट` क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींमुळे घर घेण्याकडे ग्राहक नक्कीच आकर्षित होतील. आवाक्यातील घरांची संकल्पना हा मोठा व महत्त्वाचा बदल करून आता त्याला ६० चौ. फुटांची मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर `रिअल इस्टेट` क्षेत्राला पायाभूत क्षेत्राचा दर्जा दिल्याने या क्षेत्रात गतीने बदल होईल.

नोटाबंदीनंतर कर्ज घेणार्‍यांच्या संख्येवर परिणाम झाल्याची चर्चा होऊ लागली होती. यात काहीसे तथ्य आहे, पण जानेवारीपासून ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असून, या अर्थसंकल्पानंतर तर कर्ज घेणार्‍यांच्या संख्येत निश्‍चितच वाढ होईल. जनता बँक गृहकर्ज योजनेच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत अनेक कुटुंबांचे स्वप्नातील घर साकार केले आहे. तुम्ही देखील तुमच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करू इच्छित असाल, तर नक्कीच जनता सहकारी बँकेच्या महाराष्ट्रातील कोणत्याही शाखेत संपर्क साधा.

 जनता बँकच का?

आज अनेक सहकारी बँका या क्षेत्रात कार्यरत असताना, गृहकर्ज घेण्यासाठी जनता बँकेचीच निवड का करावी, असा प्रश्‍न तुम्हाला पडणे साहजिकच आहे. पण याचे उत्तरही तितकचे महत्त्वाचे आणि तुमच्या फायद्याचे आहे. हल्ली प्रत्येकालाच कामाच्या व्यग्रतेमुळे सगळ्या गोष्टी अतिशय जलद व्हाव्याशा वाटतात. ग्राहकांची हीच मुख्य गरज लक्षात घेऊन जनता बँकेतर्फे गृहकर्जाची प्रक्रिया अतिशय जलद पद्धतीने हातळली जाते. यासाठी बँकेच्या प्रत्येक शाखेच्या व्यवस्थापकालाच कर्ज मंजूर करण्याबाबतचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्जमंजुरी प्रक्रियेसाठी एका विभागाकडून दुसरीकडे जाण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो या ठिकाणी वाचतो. त्याचबरोबर ग्राहकांना देण्यात येणार्‍या सेवेमध्ये अत्यंत पारदर्शकता असून, सगळ्या गोष्टींचा सहज ‘अ‍ॅक्सेस’ उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्रात व गुजरात राज्यात मिळून आज बँकेच्या ६८ शाखा असल्याने बँकेच्या शाखेच्या जवळपासच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घराचे स्वप्न साकार करू शकता. ‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत देखील सामान्य नागरिकांना बँकेमार्फत गृहकर्ज उपलब्ध होऊ शकते. जनता बँकेचे राज्यातील विस्तीर्ण जाळे हे देखील एक मुख्य कारण म्हणावे लागेल. त्यामुळे आता अधिक विलंब न करता आधी घराची निवड निश्चित करा आणि थेट जनता सहकारी बँकेच्या तुमच्या जवळील शाखेस भेट द्या व तातडीने गृहकर्ज घेऊन स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरू करा. 

----

जनता गृहकर्ज योजनेची ठळक वैशिष्ट्ये 

- सत्तर लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध

- परतफेडीसाठी १० ते २५ वर्षांची मुदत

- अत्यल्प व्याजदर

- मंजुरीची जलद प्रक्रिया

- शाखा व्यवस्थापकास मंजुरीचे अधिकार

- ग्रामीण, निम शहरी व शहरी भागातील ग्राहकांसाठी उपलब्ध

- राज्यभरात बँकेचे विस्तृत जाळे

- 'पंतप्रधान आवास योजने'चा लाभ घेता येणे शक्य

Powered By Sangraha 9.0