तत्पूर्वी डिसेंबर महिन्यात जनता बँक कला क्रीडा मंडळातर्फे रत्नागिरी येथे बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, टेबलटेनिस अशा स्पर्धांमधून सेवकांना आपले क्रीडागुण सादर करण्याचा वाव मिळाला. एकूण दहा शाखांमधील 60 सेवकांनी यापैकी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला.
मुख्य स्नेहसंमेलनाची सुरुवात बँकेचे कार्याध्यक्ष श्री. अरविंद खळदकर, उपाध्यक्ष श्री. संजय लेले, संचालक श्री. विजय भावे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयंत काकतकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. चिपळूण शाखा व्यवस्थापक विनायक जोशी, वेलफेअर स्टाफ असोसिएशनचे सरचिटणीस रवींद्र धुमाळ, जनता बँक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास खाडिलकर आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला. स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली व त्यानंतर क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.