संगमेश्वर शाखेतील सन्माननीय खातेदार श्री. जितेंद्र पराडकर यांना पत्रकारितेतील मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दिला जाणारा उद्योगपती कै.रावसाहेब गोगटे पुरस्कार प्रदान

17 Jul 2023 15:57:57
 
padalkar
शाखेचे सन्माननीय खातेदार व संगमेश्वर येथील पैसाफंड हायस्कूल मधील शिक्षक मा. श्री. जितेंद्र पराडकर सर यांना पत्रकारितेतील मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दिला जाणारा सन २०२१-२०२२ मधील उद्योगपती कै.रावसाहेब गोगटे पुरस्कार दि.२३.०६.२०२३ रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मा.केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीनजी गडकरी व जेष्ठ नेत्र तज्ञ पद्मश्री डॉ.श्री.तात्याराव लहाने यांचे प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. श्री. पराडकर सर गेली ३० ते ३५ वर्षे ग्रामीण भागात पत्रकारिता करीत असून ग्रामीण जीवनावर व कोकणातील निसर्ग सौंदर्यावर विविध लेख ,पुस्तके व विविध वृत्तपत्रातून वृत्तांकन प्रदर्शित झाली आहेत.
Powered By Sangraha 9.0