इचलकरंजी शाखेतील खातेदार डॉ.श्री राजेश पवार यांना सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांचेवतीने डॉ.रखमाबाई राउत सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ.पवार हे इचलकरंजी येथील सेवाभारती संचलित सुप्रसिद्ध डॉ.हेडगेवार रुग्णालयचे गेले अनेक वर्षे प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य करत आहेत. डॉ.पवार यांना त्यांच्या आतापर्यंतच्या व विशेष करून कोव्हीड काळातील प्रदान केलेल्या रुग्णसेवेबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ.श्री.राजेश पवार सध्या सेवांकुर भारत संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक म्हणून देखील दायित्व सांभाळत आहेत.