शाखेकडील खातेदार सौ. गीता उत्तम नातलेकर या साधना हायस्कूल , गडहिंग्लज येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सौ. नातलेकर यांना सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसीच्या "फर्स्ट ऑफिसर " ने सन्मानित करण्यात आले. गडहिंग्लज, आजरा व चंदगड अशा तीन तालुक्यांमध्ये सहयोगी एनसीसी अधिकारी म्हणून निवड झालेल्या सौ. नातलेकर या पहिल्या महिला अधिकारी आहेत. शाखेने सौ. नातलेकर यांचा शाखेमध्ये सन्मान केला.