ठेवीदारांचे माहितीसाठी
आयकर कायदा कलम १९४ अ अंतर्गत आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ठेवीवरील व्याजाची रक्कम रु.४०,०००/-चे आत व सिनियर सिटीझन व्यक्तीकरिता व्याजाची रक्कम रु.५०,००० चे आत असल्यास टीडीएस कपात होणार नाही. याकरिता १५ जी किंवा १५ एच देणेची आवश्यकता नाही.
१) ज्या व्यक्तीचे एकूण उत्पन रु,२,५०,०००/- पेक्षा कमी आहे व वय वर्षे ६० पेक्षा कमी आहे व विहित नमुन्यातील १५ जी फॉर्म PAN कार्डसह सादर केला असेल (व्यक्ती,एच यु एफ ,ट्रस्ट,इ.) अशा ठेवीदारांची टीडीएस कपात त्या महिन्यापासून होणार नाही.
२) ज्या व्यक्तीचे एकूण उत्पन रु,३,००,०००/- पेक्षा कमी आहे व वय वर्षे ६० पेक्षा ज्यादा व ८० वर्षा पेक्षा कमी आहे (Senior Citizen) व विहित नमुन्यातील १५ एच फॉर्म PAN कार्डसह सादर केला असेल (व्यक्ती,एच यु एफ इ.) अशा ठेवीदारांची टीडीएस कपात त्या महिन्यापासून होणार नाही.
३) ज्या व्यक्तीचे एकूण उत्पन रु,५,००,०००/- पेक्षा कमी आहे व वय वर्षे ८० पेक्षा ज्यादा आहे
(Super Senior Citizen) व विहित नमुन्यातील १५ एच फॉर्म PAN कार्डसह सादर केला असेल (व्यक्ती,एच यु एफ ,ट्रस्ट,इ.) अशा ठेवीदारांची टीडीएस कपात त्या महिन्यापासून होणार नाही.
तथापि
४) ट्रस्ट ठेवीदारांनी आयकर कायदा कलम 197(IB) अंतर्गत सर्टिफिकेट (प्रती वर्षी नव्याने घ्यावे लागणारे व आपल्या बँकेच्या ठेवीचा उल्लेख असलेले) अथवा आयकर कायदा कलम १० अंतर्गत सर्टीफिकेट (ट्रस्टला प्राप्त सर्व उत्पन कर मुक्त आहे) बँकेत सादर केल्यास अशा ठेवीदारांचे ठेवी वरील व्याजावर सर्टिफिकेटवरील नमूद दराने टीडीएस कपात होणार नाही.
५) एखाद्या ठेवीदाराने जर मागील आर्थिक वर्षात आयकर विवरण पत्र दाखल केले नसेल तर त्याचा TDS २०% दराने करण्यात येईल.