मुळातच मनुष्यप्राणी हा 'मृत्यु' या शब्दाला नेहमीच घाबरत असतो आणि ही भिती प्रत्येकाच्या मनात असणे साहजिक आहे. या बरोबरच मृत्युपत्राबाबतही समाजात एकूणच अज्ञान व भीती (फोबिया) असल्याचे आपल्याला नेहमी जाणवत आले आहे. पण आता सगळ्याच गोष्टींमध्ये मनुष्य प्रगती करत असल्याने याही बाबतीत काही अद्ययावत व गरजेच्या सेवा देऊ केल्या जात आहेत. मृत्युपत्र कोणास करता येते, कधी करावयाचे असते, का व कसे कसे करायचे व ते करण्याचे नेमके काय फायदे आहेत याची योग्य व अचूक माहिती जनसामन्यास झाल्यास निश्चितच लोक आपले मृत्युपत्र आधीपासूनच करून ठेवतील. हिच सामाजिक जाणिव सोबत घेऊन जनता सहकारी बँकेच्या एक्झिक्युटर व ट्रस्टी विभागातर्फे मृत्युपत्र/इच्छापत्र व्यवस्थापनाची सेवा ग्राहकांना दिली जाते. एकूणच इच्छापत्र या संकल्पनेची व त्यासंबंधाने दिल्या जाणाऱ्या या सेवेची विस्तृत माहिती या लेखातून आपल्याला दिली जाणार आहे.
इच्छापत्र तयार करण्यापूर्वी हे वाचा...
१) १८ वर्षावरील कोणीही व्यक्ती आपले वील करू शकते असे वील करताना सबंधित व्यक्तीस सुरवातीसच आपण हे वील स्वखुशीने करीत आहे व मी मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम असून हे वील करण्यासाठी माझ्यावर कसल्याही प्रकारचा दबाव नाही असा उल्लेख करणे आवश्यक असते याशियाय दोन साक्षीदार असणे आवश्यक असते. शक्यतो साक्षीदार विश्वासू असावेत व ते वील करणाऱ्या व्यक्ती पेक्षा किमान ८-१० वर्षांनी लहान असावेत (हे बंधनकारक नाही) जेणेकरून वील कर्ताच्या मृत्यू नंतर किमान एक तरी साक्षीदार हयात असू शकेल. वीलच्या सुरवातीस आपले स्वत:चे पूर्ण नवा, पत्ता जन्मतारीख या बाबींचा उल्लेख असावा लागतो व याच सोबत शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असल्या बाबतचे डॉक्टर सर्टीफीकेट जोडणे गरजेचे असते. शिवाय आपले आधार कार्ड/पॅन कार्ड यासारख्या ओळख पत्राची प्रत सोबत जोडावी तसेच साक्षीदाराची पण आधार कार्ड/पॅन कार्ड यासारख्या ओळख पत्राची प्रत सोबत जोडावी.
२) यानंतर आपल्या सर्व चल अचल संपत्तीचा तपशील उदा: घर, अन्य स्थावर मिळकत( शेत जमीन, व्यवसायिक जागा, प्लॉट) सर्व्हे नंबर, आकार, लोकेशन, या माहितीसह ( शक्य असल्यास, इंडेक्स २, ७/१२, खरेदी व्यवहाराची कागद पत्र किंवा तत्सम मालकी दाखवणारी कागद पत्रे यांचा झेरॉक्स प्रतीसह), सोने ( कोणते दागिने व किती वजनाचे), चांदी तसेच अन्य मौल्यवान वस्तू, बँक खाती,व ठेवी, शेअर्स, म्युचुअल फंड, बॉंड, पीपीएफ, पेन्शन फंड किंवा तत्सम अन्य गुंतवणुकीचा तपशील व या सर्वांची वील करत असलेल्या तारखेस बाजार भावाने असणारी किंमत याचा उल्लेख असावा लागतो.
३) शक्य तीतक्या लवकर वील करणे योग्य असते कारण नेमका मृत्यू कधी येणार हे कोणालाच माहित नसते आणि वील न करता मृत्यू आल्यास आपल्या पश्चात आपल्या संपत्तीचे वाटप होण्यास विलंब होऊ शकतो किंवा वारसात संपत्ती वाटपावरून वाद निर्माण होऊन सबंध कलुषित होऊ शकतात. हे जर टाळायचे असेल तर शक्य तितक्या लवकर वील करणे हितावह असते शिवाय केलेल्या वील मध्ये गरजेनुसार कधीही व कितीही वेळा बदल करता येतो. अशा प्रकारे केलेला बदल हा 'पुरवणी' (codicil) म्हणून ग्राह्य धरला जातो. याशिवाय कोणत्याही क्षणी तुम्हाला नवीन वील देखील करता येते. अशावेळी वीलमधील आधीच्या बाबी ग्राह्य रहात नाहीत. मात्र आपण ज्या वेळी बदल करणार आहात किंवा नव्याने वील करणार आहात या प्रत्येक वेळी वरील क्रमांक १ नुसार सर्व बाबींची पूर्तता करणे आवश्यक असते.
४) वील कर्ता व त्यानुसारचे लाभार्थी यांच्या व्यतिरिक्त वील साठी एक एक्झिक्युटर नेमावा लागतो व या एक्झिक्युटरने वील कर्त्याच्या मृत्यू नंतर वील नुसार चल/अचल संपत्तीचे वाटप करावयाची जबाबदारी पार पाडायची असते. असा एक्झिक्युटर नेमताना विश्वासू व्यक्तीची निवड करावी व त्याधी या साठी त्याची संमती घेणे आवश्यक असते. एक्झिक्युटर नेमला नसेल तर कोर्टने नेमलेला एक्झिक्युटर ही जबाबदारी पार पाडतो मात्र यास वेळ लागू शकतो म्हणूनच वील कार्त्यानेच एक्झिक्युटर नेमणे आवश्यक असते. वील केल्या नंतर त्या बाबतची माहिती सबंधीताना लगेचच देणे बंधनकारक नाही .
५) केवळ वील करून भागत नाही तर आपण केलेले वील सुरक्षित कसे राहील व आपल्या पश्च्यात त्याची योग्य रीतीने व त्वरित अमलबजावणी कसी होईल याची व्यवस्था आपणच करावी लागते.त्या दृष्टीने वीलचे रजिस्ट्रेशन करणे श्रेयस्कर असते या मुळे आपले विल सुरक्षित राहते व त्यात आपल्या अपरोक्ष बदल होऊ शकत नाही. मात्र वील रजिस्टर करणे बंधनकारक नाही. असे असले तरी वील रजिस्टर असल्यास त्याला आव्हान (चालेंज) देणे तितके सोपे नसते. मात्र एकदा वील रजिस्टर केले कि भविष्यात वीलमध्ये केलेले बदल अथवा नवीन वील रजिस्टर करावे लागतात.
६) वील साठी एखादा विहित नमुना (फॉरमॅट) नाही आपण आपले वील आपल्याला हव्या त्या पद्धतीने करू शकतो. साध्या कोऱ्या कागदावर स्वत: लिहूनसुद्धा करू शकतो यासाठी वकिलाचा सल्ला घेतलाच पाहिजे किंवा कोर्टामार्फत केले पाहिजे असे नाही.
थोडक्यात असे म्हणता येईल कि वील केल्याने आपल्या पश्च्यात आपल्या चल/अचल संपत्तीचे हस्तांतरण आपल्या इच्छेनुसार त्वरित होऊ शकते यामुळे लाभार्थींना विनासायास त्याचा फायदा होऊ शकतो याउलट जर वील नसेल तर 'सक्सेशन' मिळण्यास लागणाऱ्या विलंबामुळे गैरसोय होऊ शकते. प्रसंगी कुटुंबियांवर आर्थिक संकट येऊ शकते. तसेच वील नसेल तर वारसात संपत्तीवरून वाद निर्माण होऊन कोर्टकचेरी सुरु होऊन वेळेचा, पैशाचा अपव्यय तर होतोच शिवाय वारसांची मने एकमेका विषयी कलुषित होऊन कुटुंबातील सौदार्ह्याचे वातावरण संपुष्ट होऊ शकते. हे सर्व टाळण्याचे दृष्टीने प्रत्येकाने सोप्या भाषेत (गुंतागुंतीचे नसावे) शक्य तितक्या लवकर आपले वील करणे निश्चितच हितावह असते.
सध्याचा काळ अत्यंत धकाधकीचा बनला आहे. अशातही आपले जीवनमान आधीपेक्षा जास्त समृद्ध झाल्याचे दिसते. पण याची दुसरी बाजू बघता माणूस आणि त्याचे आयुष्य मोठ्या प्रमाणात असुरक्षित झाले असल्याचे सत्यही आपण नाकारू शकत नाही. पूर्वी असं म्हणायचे की मनुष्य उतारवयाला लागला की त्याने इच्छापत्र/मृत्युपत्र (Will) लिहायला घ्यावे. पण आता असुरक्षितता इतकी वाढली असल्याने खरंच इच्छापत्र लिहून ठेवण्यासाठी उतारवयाची वाट बघावी का असा प्रश्न पडतो. आपल्या पश्चात आयुष्यभराच्या कमाईचा कोणत्याही कौटुंबिक कलहाशिवाय योग्य विनियोग व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर आजच इच्छापत्र तयार करून ते सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. आता या धावपळीच्या आयुष्यात इच्छापत्र तयार कधी करणार, त्याचं व्यवस्थापन कोण करणार आणि ते ठेवणार कुठे असे प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे; पण त्या सगळ्यावर एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे 'जनता सहकारी बँक!'
'इच्छापत्र' या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन जनता सहकारी बँकेतर्फे 'एक्झिक्यूटर व ट्रस्टी विभाग' स्वतंत्ररीत्या कार्यरत आहे. आजपर्यंत अनेक इच्छापत्रांचे व्यवस्थापन करणारी संस्था म्हणून जनता बँकेकडे विश्वासाने पहिले जाते. तुमच्या आयुष्याची ही एक अशी 'सिक्रेट' आहे, की ती तुम्ही अगदी विश्वासाने जनता बँकेच्या 'कस्टडी'मध्ये ठेवू शकता. व्यवस्थापक शक्यतो इच्छापत्राचा लाभार्थी नसावा. 'व्यक्तीपेक्षा संस्था बरी' या नात्याने जनता बँक अशा प्रकारे 'व्यवस्थापक' म्हणून काम स्वीकारते.
इच्छापत्रासंदर्भात जनता बँकेतर्फे पुरविल्या जाणाऱ्या वैशिट्यपूर्ण सेवा
- तज्ञ वकिलांचा सल्ला
- इच्छापत्राची तंतोतंत कार्यवाही
- आवश्यक ती गुप्तता
- सुरक्षेच्या दृष्टीने 'कस्टडी'
- पारदर्शक व्यवहार
- माफक दर
जनता सहकारी बँकेला तुमच्या इच्छापत्राचा 'व्यवस्थापक' नेमण्यासाठी आत्ताच खालील क्रमांकावर कॉल करा!
९८९०६८०७१०
९५११९०१५५८
executor-trustee@janatabankpune.com