By Using JSB RuPAY - लूट मचाओ, पैसे बचाओ!

22 Jan 2019 18:31:00

 

आपले आणि खरेदीचे अतूट असे नाते आहे. त्या नात्याला अधिक वृद्धिंगत करण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे काही क्लुप्त्या लढविल्या जातात. त्यातच सध्या फॉर्मात असणाऱ्या व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा यांसारख्या ऑनलाईन स्टोअर्सच्या माध्यमातूनही खरेदीदारांची संख्या वाढविण्यासाठी अनेक नवीन संकल्पना बाजारात आणल्या जात आहेत. एकीकडे ऑनलाईन पद्धतीच्या व्यवसायाचे विस्तारीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे, पण दुसरीकडे भारतीय संस्कृतीला प्राधान्य देणाऱ्या बिग बाजार, डीमार्ट, ब्रँड फॅक्ट्री यांसारख्या कंपन्या देखील ऑनलाईन व्यवसायाचा मोठ्या हिमतीने सामना करीत आहेत. स्पर्धेत टिकायचे असल्यास नवीन संकल्पना आणणे किंवा विशेष करून खरेदीवर मोठी सवलत देणे हे मार्केटिंगचे ठरलेले गिमिक आहे. अशीच एक आश्चर्यकारक सवलत घेऊन बिग बाजार आपल्यासमोर येत आहे. भारतातील प्रसिद्ध हिप-हॉप आर्टिस्ट एमीवे बंताई याने त्याच्या हटके ढंगात तमाम भारतीयांना 'लूट मचाओ, पैसे बचाओ' असे आवाहन केले आहे. 

 

 

 सबसे सस्ते पाच दिन 

शक्यतो अशा प्रकारच्या सवलतींचा खरेदी मोहत्सव हा लागून येणाऱ्या सुट्ट्यांच्या दोन दिवस आधी व नंतरच्या कालावधीत आखला जातो. यंदाही बिग बाजारने अगदी अचूक टायमिंग साधत २३ जानेवारी ते २७ जानेवारी २०१९ च्या दरम्यान 'सबसे सस्ते पाच दिन' या नावाने हा भव्य मोहोत्त्सव ग्राहकांसाठी आणला आहे. या पाच दिवसात बिग बाजारमध्ये मिळणाऱ्या वस्तू भारतातील इतर कंपन्यांच्या किंमतीपेक्षा कमी पैशात उपलब्ध होणार असल्याचा दावा बिग बाजारने केला आहे. त्यामुळे एखादी नवीन वस्तू घेण्याच्या तयारीत तुम्ही असाल तर ती याच पाच दिवसात घेऊन टाका कारण इतक्या स्वस्त किमतीत ती वस्तू पुन्हा उपलब्ध होईल की नाही याबद्दल शंकाच आहे. केवळ एखादी मोठी वस्तूच असं नाही तर खाद्यपदार्थ, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, किचन मधील वस्तू, किराणा माल, फळ-भाजी आदी सगळ्याच गोष्टींची याठिकाणी अक्षरशः रेलचेल असणार आहे. 

 

 तब्बल १० टक्के सवलत 

सबसे सस्ते पाच दिन मध्ये बिग बाजारने स्वतःची २० टक्के कॅशबॅकची (३००० रुपयांवरील खरेदीवर) सवलत योजना जाहीर केलीच आहे पण त्याशिवाय जनता सहकारी बँकेचे रूपे डेबिट कार्ड वापरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला खरेदीवर  बिग बाजारतर्फे अतिरिक्त १० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. वरील दोन्ही सवलतींचा एकत्रितपणे लाभ मिळाल्यास धमाकेदार सवलतींच्या खरेदीने तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात होईल. या पाचदिवसांच्या कालावधीसाठी 'लूट मचाओ, पैसे बचाओ!' हे स्लोगन अगदी चपखल वाटत आहे. कारण यातून तुम्हाला खरेदीचा आनंदही मिळणार आहे व त्याचबरोबर रूपे डेबिट कार्डच्या वापरामुळे तुमची भरघोस बचतही होणार आहे. चला तर मग, तुमचे नियोजित असलेले सगळे प्लॅन्स काही काळासाठी रद्द करा आणिजवळच्या बिग बाजारला भेट द्या. फक्त सोबत जनता बँकेचे रूपे डेबिट कार्ड ठेवायला विसरू नका!

 

रूपे डेबिट कार्ड सवलत : नियम व अटी

* किमान ५०० रुपयांच्या व्यवहारावर अतिरिक्त ७ टक्के सूट.
* प्रत्येक व्यवहारावर कमाल १७५ रुपयांची सूट.
* किमान ५००० रुपयांच्या व्यवहारावर अतिरिक्त १० टक्के सूट.
* प्रत्येक व्यवहारावर कमाल ७५० रुपयांची सूट.
* प्रत्येक कार्डावर जास्तीतजास्त १ व्यवहार.

 

* वैधता : २७ जानेवारी २०१९ पर्यंत

 

 

 

Powered By Sangraha 9.0