UPI पेमेंट – देशविदेशातील आपला खात्रीशीर सोबती

JSB Financial Blog    17-Mar-2023
|


UPI
UPI
 
राजू काल सिंगापूरला पोहोचला होता. बऱ्याच दिवसांचे राजूच्या कुटुंबियांचे स्वप्न पूर्ण झाले होते. राजूने सिंगापूरमधील एका कंपनीची परिक्षा उत्तीर्ण केली होती. त्याला स्कॉलरशीप मिळाल्यामुळे तो सध्या सिगापूरला पोहोचला होता. कंपनीत इंटर्नशीप आणि त्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी अशी रचना होती.
 
सिंगापूरला गेल्यावर एका ठिकाणी त्याची बॅग हरवली. फक्त मोबाईल त्याच्या जवळ होता. काय करावे त्याला समजत नव्हते. खूप तणावाखाली राजूने आपल्या नजिकच्या मित्राला फोन केला.
 
आणि काय आश्चर्य... मित्राने त्याला सांगितले की तुझी भारतातील UPI सुविधा इथे सिंगापूरमध्ये आता लागू झाली आहे. तू कोणतेही आर्थिक व्यवहार सहजगत्या इथे करु शकतोस.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे त्यांचे समपदस्थ ली हसेन लुंग यांनी दोनही देशांदरम्यान क्रॉस बॉर्डर कनेक्टीव्हिटी ची सुरुवात केली. दुरस्थ पध्दतीने दोनही नेत्यांनी भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि सिंगापूरच्या PayNow यांच्यात देवाणघेवाणीचा मार्ग खुला केला. RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सिंगापूरच्या नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक रवी मेनन यांनी प्रत्यक्ष या सुविधेची सुरुवात केली.
 

UPI बद्दल जाणून घ्या

 
युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) ही एक इंस्टंट पेमेंट सिस्टीम आहे, जी तुम्ही मोबाइल प्लॅटफॉर्मद्वारे दोन पक्षांदरम्यान पैसे ट्रान्सफर करताना , मदत करते. Google Pay मध्ये बँक खाते जोडण्यासाठी, तुमच्या बँकने UPI सह काम करायला हवे.
 

तुमच्याकडे UPI आयडी असणे का आवश्यक आहे?

 
एक UPI वापरकर्ता म्हणून, तुम्हाला UPI आयडी नावाचे युनिक आयडेंटिफायर तयार करणे आवश्यक आहे, जे तुमच्या बँक खात्याशी संबंधित आहे. यामुळे तुमच्या बँक खात्यामधून त्वरित पैसे पाठवणे आणि मिळवणे सोपे होते. तुम्ही तुमचा खाते क्रमांक किंवा इतर तपशील शेअर करण्याची आवश्यकता नाही.
 
Google Pay मध्ये, तुमचा UPI आयडी हा पेमेंट सेवा पुरवठादार बँकद्वारे जनरेट केला जातो
 
उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्या घरापासून ऑफिसपर्यंत कारने पोहोचायचे आहे, आणि तुमच्याकडे चार वेगवेगळे मार्ग आहेत जे तुम्ही वापरू शकता. रहदारीची खूप कोंडी झाल्यामुळे तुमचा नेहमीचा मार्ग ब्लॉक झाला आहे, त्यामुळे तुम्ही उपलब्ध असलेल्या इतर तीन मार्गांपैकी कोणताही मार्ग निवडता. यासारखेच युपीआयचे काम चालते.
 
वेगवेगळ्या बँकेसोबतचे अतिरिक्त UPI आयडी व्यवहार करण्यासाठी वेगवेगळे मार्ग पुरवतात. एखादे UPI आयडी मार्ग उपलब्ध नसल्यास, तुमच्या पेमेंटचा अनुभव सुलभ होण्याची खात्री करण्यासाठी Google Pay तुमच्या पेमेंटकरिता दुसरा मार्ग निवडेल.
 

तुमच्याकडे किती UPI आयडी असू शकतात?

 
तुम्ही तुमच्या बँक खात्यासाठी कमाल चार UPI आयडी जोडू शकता. तुमच्याकडे एकाच बँक खात्यासाठी एकाहून अधिक UPI आयडी असू शकतात. यामुळे पेमेंट करण्यास उशीर होणे किंवा ते करता न येणे यांसारख्या समस्या कमी होतात आणि हे Google Pay द्वारे सुरक्षित असते.
 

अतिरिक्त UPI आयडी कसे तयार करायचे?

 

अतिरिक्त UPI आयडी तयार करण्याचे अनेक मार्ग आहेत:

  • तुम्ही Google Pay मध्ये नवीन खाते सेट करता तेव्हा, एकापेक्षा अधिक UPI आयडी तयार करू शकता.
  • तुम्ही केलेल्या पेमेंटमध्ये समस्या येत असल्यास किंवा ते पूर्ण होत नसल्यास, तुम्हाला तुमच्या अस्तित्वात असलेल्या बँक खात्यामध्ये नवीन UPI आयडी जोडण्याची सूचना दिसू शकते.
  • UPI पेमेंट्सबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, पुढील 5 वर्षांत UPI व्यवहार दररोज एक बिलियनपर्यंत पोहोचू शकतात. तसेच, NPCI ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जुलै 2022 मध्ये UPI द्वारे 6.28 बिलियन पेमेंट्स करण्यात आले आहेत. जर किंमतीच्या आधारावर पाहिले तर ते 10.62 ट्रिलियन रुपये किंवा जवळपास 11 लाख कोटी रुपये आहे.

कसे काम करते पैसे ट्रान्सफरची UPI सिस्टम?

 
हे फीचर वापरणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Paytm, Phonepe, Google Pay, BHIM इत्यादी कोणतेही UPI अॅप डाउनलोड करावे लागेल. तुम्ही तुमचे बँक खाते UPI अॅपशी लिंक करून ही सिस्टम वापरू शकता. UPI द्वारे, तुम्ही एक बँक खाते एकाधिक UPI अॅप्सशी लिंक करू शकता. त्याचवेळी, एका UPI अॅपद्वारे अनेक बँक खाती ऑपरेट केली जाऊ शकतात. विशेष बाब म्हणजे तुमच्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, UPI आयडी अशी एकच माहिती असली तरीही UPI तुम्हाला पैसे ट्रान्सफर करू देते.
 
 

हे टाळा

UPI पध्दत वापरताना आपला पीन नंबर तीन वेळा टाकणे टाळा. तिसऱ्यांदा चुकीचा पीन टाकल्यास तुमचे UPI ब्लॉक होऊ शकते. तुमचे कार्ड हरवले तर आपल्या बँकेच्या २४ तास चालणाऱ्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि आपले UPI खाते बंद करण्याची विनंती करा. जेणे करुन कोणताही गैरव्यवहार टाळता येईल.
 
राजूने आपल्या मित्राबरोबर बसून UPI बाबत चर्चा केली आणि हा आपला इथला खरा मित्र असल्याची खात्रीच राजूला पटली. परदेशांत असूनही त्याचे पुढील सर्व प्रश्न अगदी सहज सोडवले गेले. भारतीय परराष्ट्र धोरणाचे राजूने मनोमन आभार मानले आणि Ministry of Foreign Affairs च्या ट्विटर हँडल वर तशी पोस्टही शेअर केली.