आपण मार्चअखेरची आर्थिक कामे पूर्ण केली आहेत का..?

JSB Financial Blog    18-Mar-2024
|
आर्थिक वर्ष 2023-24 च्या अंतिम काही दिवसांत अर्थात कॅलेंडरवर मार्क करायला विसरु नका. यासाठी लागणाऱ्या सर्व तरतूदी, कागदपत्रासाठीची पुर्तता करुन आपले आयकरासंदर्भातील कर्तव्य पूर्ण करुया.
 
आर्थिक गुंतवणूक, भविष्यातील नियोजन आणि तरतूदी हा प्रत्येकाचा वैयक्तिक मिळकतीनूसार व्यवस्थापनाचा भाग आहे. गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. प्रामुख्याने बँकेतील किंवा खासगी वित्तिय संस्थेतील गुंतवणूक, पोस्टातील योजना, घर, गाडी, म्युचुअल फंडचे विविध प्रसार, पीपीएफ, नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट आदी बाबींमध्ये गुंतवणूक केल्याने भविष्यातील संकटांचा सामना करणे सोपे जाते. आर्थिक निकषांचा विचार करुन व्यक्ती किंवा समूहाने गुंतवणूक केली जाते.
 

ITR 
 
आपली मिळकत, वेतन, कमिशन, लाभांश, शुल्क आदींच्या माध्यमातून जी रक्कम आपल्याला मिळते त्यावर सरकारी नियमानूसार कर भरावा लागतो. हा कर योग्य कायदेशीर पर्यायांचा वापर करुन कमी करता येतो किंवा पूर्णपणे वाचवता येऊ शकतो. गुंतवणूकीच्या आधारे आपण कोणत्या टॅक्स स्लॅबमध्ये येतो हे पाहणे आवश्यक असते. योग्य अभ्यास करुन दरवर्षी कायद्यानुसार विवरणपत्र दाखल करावे लागते. कर नियोजन करताना या क्षेत्रातील तज्ञांचा तसेच आर्थिक सल्लागारांची जरुर मदत घ्यावी.

नवीन कर प्रणाली (न्यू टॅक्स रेजीम)
 
  • या न्यू टॅक्स रेजीम म्हणजे नवीन कर प्रणालीत सर्वांनाच म्हणजे वैयक्तिक करदाते, सिनीअर सिटीझन्स - ज्येष्ठ नागरिक, सुपर सिनियर सिटीझन्स - अति ज्येष्ठ या सगळ्यांसाठी एकच कररचना आहे.

  • या न्यू टॅक्स रेजीममध्ये 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागत नाही.

  • 3 ते 6 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर लागतो. (सेक्शन 87A अंतर्गत टॅक्स रिबेट उपलब्ध)

  • 6 ते 9 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर लागतो. (सेक्शन 87A अंतर्गत 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स रिबेट उपलब्ध)

  • 9 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15% कर लागतो.

  • 12 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% कर लागतो.

  • 15 लाखांवरील उत्पन्नावर 30 टक्के दराने कर आकारला जातो.

*जुन्या कर प्रणालीमध्ये 60 वर्षांवरील पण 80 वर्षांखालील ज्येष्ठ नागरिंकांचं 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे.
तर 80 वर्षांवरील अति ज्येष्ठांचं 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे.

इतरांसाठीची कर संरचना
 
  • 2.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त.

  • 2.5 ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% आयकर.

  • 5 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% आयकर आकारला जातो.

  • 10 लाखांवरील उत्पन्नावर जुन्या कर प्रणालीनुसार 30% आयकर आकारला जातो.

   नवीन प्राप्तिकर रचना  उत्पन्नाचे भाग
(रु.)

कराची रक्कम
(रु.)

 
 ० ते ३,००,०००  0 %  ३,००,०००  काहीही नाही
 ३,००,००० ते ६,००,०००  ५ %  ३,००,०००  १५,०००
 ६,००,००० ते ९,००,०००  १० %  ३,००,०००  ३०,०००
 ९,००,००० ते १२,००,०००  १५ %  ३,००,०००  ४५,०००
 १२,००,००० ते १५,००,०००  २० %  ३,००,०००  ६०,०००
 १५,००,००० पेक्षा जास्त  ३० %  १,००,०००  ३०,०००
       १,८०,०००
 उपकर  ४ %    ७,२००
 अंतिम प्राप्तिकर      १,८७,२००

नोकरदार किंवा निवृत्तीवेतनधारक करदात्यांना ५० हजार रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन मिळते.
 
अर्थात रु. ७.५० लाख रुपयांच्या उत्पन्नावर सूट मिळते. हे आयकर कलम ८७ए अंतर्गत नवीन करप्रणाली निवडल्यास मिळते.
 
पुढील आर्थिक वर्षाचे नियोजन करण्यासाठी आजपासूनच काम करुया..