आपण मेहनत करतो, पैसे कमावतो आणि वैयक्तिक तसेच कुटुंबाच्या सुख शांतीसाठी आणखी काय करता येईल याचा विचार करतो. दैनंदिन जीवन जगताना नियमित गरजांबरोबरच भविष्याची तरतूद करणं ही आवश्यक आहे.
बचत करणे, अनावश्यक खर्च टाळणे, पैशाची मिळकत आणि खर्चाचा ताळमेळ, भविष्याची तरतूद करणं म्हणजे नेमकं काय? त्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ कसे मिळवता येईल? आपत्कालीन परिस्थितीमध्ये पैसे कसे उभे करता येतील? या सगळ्यांचे नियोजन आणि त्याबद्दलची सजगता म्हणजेच आर्थिक साक्षरता…
आज प्रामुख्याने गुंतवणूक आणि मुदत ठेव याबद्दल माहिती घेऊया -
गुंतवणूक का करावी ?
नियमित गरजांबरोबरच भविष्याची तरतूद करण्यासाठी गुंतवणूक आवश्यक आहे. दैनंदिन निकड पूर्ण करताना करावी लागणारी कसरत याबरोबरच वाढत चाललेली महागाई व त्यामुळे वाढत चाललेल्या आर्थिक गरजा लक्षात घेता, प्रत्येकाने त्यांच्या बचतीवर लक्ष केंद्रित करायला हवे. कारण जितके जास्त पैसे तुम्ही बचत कराल तितकेच जास्त आत्मविश्वासाने तुम्ही आर्थिक अडचणींना सामोरे जाऊ शकाल.
बचत करण्याबरोबरच तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. कारण तुमचे भविष्य सुखी व समाधानी असण्यासाठी गुंतवणूक हा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. नियमित गुंतवणूक करणे ही भविष्यकाळ सुकर करण्यासाठीची महत्वाची पुंजी आहे.
महागाईचा प्रभाव आणि गुंतवणुकीचे महत्त्व –
आजकाल महागाई म्हणजे किरकोळ बाजारातील भाववाढीमुळे तुमच्याकडील पैशांची किंमत कमी होते.
जेव्हा महागाई दर वाढतो, तेव्हा तेवढ्याच किमतीमध्ये कमी वस्तू खरेदी केल्या जातात.
जर तुम्हाला या महागाईच्या जगात सुखी समाधानाने राहायचे असेल, तर तुम्ही बचत करणे व बचतीतून मिळणाऱ्या परताव्याव्दारे ‘पैशाने पैसा वाढवणे’ आवश्यक आहे.
बहुतेक व्यवहारांच्या आर्थिक जगतात दोन संकल्पना आहेत. एक म्हणजे बचत आणि दुसरी म्हणजे गुंतवणूक. पैशांसंदर्भात अंमलबजावणीच्या बाबतीत या दोन्ही संकल्पनांमध्ये खूप फरक आहे.
मुदत ठेव म्हणजे काय?
भांडवली बाजारातील सध्याची अनिश्चिततेची स्थिती लक्षात घेता, मुदत ठेव योजना चांगला परतावा देऊ शकते.
मुदत ठेव ज्याला FD म्हणूनही ओळखले जाते, हे एक गुंतवणूक साधन आहे जे बँका, तसेच नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) त्यांच्या ग्राहकांना पैसे वाचविण्यासाठी आकर्षक व्याज देऊन चांगला परतावा देतात. मुदत ठेव खात्यासह, तुम्ही निश्चित कालावधीसाठी पूर्वनिर्धारित व्याजदरावर मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवू शकता. नियोजित कालावधीनंतर तुम्हाला व्याजासह एकरकमी परतावा मिळतो, जी पैशांची बचत करणारी चांगली योजना आहे. विशिष्ट मुदत ठेव खात्यासाठी बँका वेगवेगळे व्याजदर देतात.
काही बँक किंवा पोस्ट ऑफिसद्वारे मुदत ठेवीमध्ये अथवा FD मध्ये जमा केलेली रक्कम ठराविक कालावधीपूर्वी काढता येत नाही. परंतु काही बँका यासाठी अपवाद आहेत.
बचत आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टी पैशाचा वापर करण्याच्या दृष्टिकोनात भिन्न आहेत. बचत ही संपत्ती जमा करण्याचा एक निष्क्रिय मार्ग म्हणून समजली जाऊ शकते, परंतु गुंतवणूक ही परतावा मिळवण्याचा एक अधिक आक्रमक मार्ग म्हणून पाहिली जाऊ शकते. बहुतेकदा, बचती अंतर्गत, ग्राहक बचत खाते घेतात आणि त्या खात्यात रोख रक्कम साठवतात. खातेधारकाला गरज पडेल तेव्हा ही रोख रक्कम वापरली जाऊ शकते.
महाराष्ट्रातील सहकारी बँका ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम आहेत. या बँकांच्या माध्यमातून विविध ठेव योजना उपलब्ध आहेत, ज्यामुळे लोकांना सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक करता येते.
ठेव योजनांचे महत्त्व:
सुरक्षित गुंतवणूक:
सहकारी बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवी सुरक्षित असतात.
या बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात.
आकर्षक व्याजदराचा लाभ मिळतो.
चांगला परतावा:
सहकारी बँका विविध ठेव योजनांवर आकर्षक व्याजदर देतात.
यामुळे लोकांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो.
विविध योजना:
- सहकारी बँकांमध्ये मुदत ठेव (Fixed Deposit)
- बचत खाते (Saving Account)
- आवर्ती ठेव (Recurring Deposit) इत्यादी विविध योजना उपलब्ध असतात.
- लोकांना त्यांच्या गरजेनुसार आणि क्षमतेनुसार योजना निवडता येते.
- जनता बँकेच्या दोन मुदत ठेव योजनेला ग्राहकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे.
अमृतवृष्टी' मुदत ठेव योजना
ठेव प्रकार -
- मासिक व्याज
- तिमाही व्याज
- पुनर्गुंतवणूक पर्याय उपलब्ध
- ठेव कालावधी - ४४४ दिवस
- व्याजदर - सर्व साधारण - ७.६०%
- ज्येष्ठ नागरिक - ८.१० %
**************
आपल्या गुंतवणूकीला आकर्षक व्याजदराचे बळ देण्यासाठी
अमृतकुंभ मुदत ठेव योजना
- “90 Days”
- ठेव कालावधी – ९० दिवस
- व्याजदर : सर्वसाधारण – ५.६०%
- व्याजदर : ज्येष्ठ नागरिक – ६.१०%
अल्पमुदत ठेव योजना | योजना मर्यादित कालावधीसाठी
जनता सहकारी बँकांमधील ठेव योजना सुरक्षित, फायदेशीर आणि व्यावसायिकांना मदत केल्याने स्थानिक विकासाला चालना देणाऱ्या आहेत. त्यामुळे, आपल्या भविष्याची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते.