सर्वसामान्यांच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग ... जनता बँकेची वाहन कर्ज योजना

JSB Financial Blog    21-Mar-2025
|

Janata Bank Pune
 
राहुल एक मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण. पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. गावाकडे कुटुंब, पावसाच्या पाण्यावर पिकणारी छोटीशी शेती आणि घरचा कुटीरउद्योग, अतिशय संघर्षाने आईने त्याला शिकवले. डिप्लोमा आणि नंतर डिग्री करुन तो आता शहरातील खासगी कंपनीत काम करु लागला होता. अशी पार्श्वभूमी असलेला राहुल शहरांत एका मित्राबरोबर रुम शेअर करुन राहत होता. पण कंपनी आणि रुम हे बरेच अंतर होते. रोज बस, रिक्षा आणि मेट्रो किंवा लोकल ट्रेनच्या गर्दीतून मार्ग काढत ऑफिस गाठायचं, ही त्याची रोजची दिनचर्या. पण प्रत्येक प्रवास त्याच्यासाठी एक संघर्ष होता.
 
दररोजची गर्दी, गर्दीतून वाट काढतानाची होणारी भांडणे, संघर्ष या सर्व गोष्टींचा राहुलला कंटाळा आला होता. आपली स्वत:ची गाडी असती तर बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या असत्या. गावाकडे सहज जाता आले असते आणि शेतीच्या कामाला सुटीच्या दिवशी मदत करता आली असती असे त्याला वाटे.
 
त्याला स्वतःची गाडी घ्यायची होती, पण पुरेसे पैसे जमवणे कठीण होतं. मोठ्या बँकांचे नियम, कागदपत्रांची पूर्तता आणि व्याजदर पाहून राहुल विचारात पडत असे.
 
स्वतःची गाडी घेण्याचं स्वप्न कधी पूर्ण होणार? असा प्रश्न त्याला सतावत होता. तशातच एक दिवस त्याला आपला गावाकडचा एक मित्र भेटला. वयाने मोठा आणि पुण्यातल्या नावाजलेल्या जनता बँकेत चांगल्या पदावर गेली अनेक वर्षे तो नोकरीला होता. बऱ्याच वर्षाने भेट झाल्याने या मित्राने राहुलला घरी नेले. मनसोक्त पोटभर घरचे जेवण झाल्याने राहुल सुखावला. गप्पांचा तर फडच रंगला. बोलता बोलता राहुलने आपल्या मनातील व्यथा मित्राला सांगितली. मित्राने त्याला विश्वास दिला आणि दुसऱ्या दिवशी बँकेत बोलावले.
 
जनता बँकेची साथ – एक सोपा मार्ग!
 
राहुल ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी जनता बँकेत पोहोचला. बँकेत ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व प्रकारची वाहने जसे की, -
 
  1. चारचाकी वाहन
  2. दुचाकी वाहन
  3. इलेक्ट्रिक वाहन
  4. व्यावसायिक वाहन
 
आदी वाहनकर्जांसाठीचे पोस्टर आणि त्यावरील अतिशय आकर्षक असे व्याजदर फ्लेक्सवर झळकत होते. राहुलच्या मित्रानी त्याला सहज आणि सोपी कर्जप्रक्रिया समजावून सांगितली. राहुल अतिशय खुश झाला. बँकेत आलेल्या ग्राहकांनी, बँकेची साथ कशी लाभते आणि हीच साथ त्यांचे आयुष्य बदलवणारी ठरली, याबद्दलचे मनोगत व्यक्त केले. त्यामुळे तर राहुलला विश्वास निर्माण झाला.
 
इतक्या सहज आणि आत्मियतेने आपल्याला बँक मदत करेल असे त्याने कधी स्वप्नातही पाहिले नव्हते. हे नवीन वर्ष मात्र त्याच्यासाठी खरा आनंद देणारे ठरले.
 
"आपल्या माणसांसाठी खास वाहन कर्ज योजना आहे" हे ऐकताच राहुलने बँकेत कर्जप्रक्रिया समजून घेतली.
 
  • कमी व्याजदर
  • सोपी परतफेडीची प्रक्रिया
  • कमी कागदपत्रं, जलद प्रोसेसिंग
 
हे ऐकल्यावर राहुलला हायसं वाटलं. त्याने लगेच अर्ज केला, आणि काही दिवसांतच त्याच्या स्वप्नांना गती मिळाली – चमचमणाऱ्या नव्या दुचाकीच्या चाव्या त्याच्या हातात होत्या!
 
आता प्रवास झाला सोपा!
 
आता राहुल वेळेवर ऑफिस गाठतो, घरच्यांसोबत फिरतो आणि स्वतःच्या मेहनतीने मिळवलेल्या गाडीचा आनंद घेतो. त्याच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास आहे. जनता बँकेच्या साथीने त्याचं स्वप्न साकार झालं!
 
तुमचंही स्वप्न होऊ शकतं पूर्ण!
 
राहुल सारखीच तुम्हालाही नवी कार किंवा दुचाकी घ्यायची आहे का? मग वाट कसली पाहताय?
आजच बँकेच्या जवळच्या शाखेत संपर्क साधा.
राहुलने घेतलेल्या दुचाकीसाठी अतिशय सोप्या पध्दतीने कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करुन त्याचे स्वप्न साकार झाले. या गुढीपाडव्याला तो स्वत:च्या गाडीवर गावाकडे जाणार आहे. ही त्याच्या कुटुंबासाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.