कोणास मिळते शैक्षणिक कर्ज?

JSB Blog    25-Jun-2016
|


 

कोणाही गुणवंत भारतीय विद्यार्थ्यास मान्यताप्राप्त पाठ्यक्रमांसाठी (१२ वी अथवा समकक्ष शिक्षणानंतर) हे कर्ज मिळू शकते. केवळ महाविद्यालयीन शिक्षणासाठीच नव्हे, तर व्यावसायिक पाठ्यक्रमांसाठी देखील कर्ज मिळू शकते. विविध कौशल्य विकासाच्या पाठ्यक्रमाना सुध्दा ते उपलब्ध आहे. सर्वसामान्य प्रवेश प्रक्रियातून मिळालेल्या प्रवेशासाठी कर्ज मिळेलच. पण व्यवस्थापकीय श्रेणीतून प्रवेश मिळाला असल्यास त्याचाही विचार होऊ शकेल. कमाल वयोमर्यादा ३५ पर्यंत असू शकते.  एखाद्या विद्यार्थ्यास परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे असले तरीही कर्ज मिळेल. अट एवढीच की ज्या संस्थेत शिक्षण घ्यायचे तेथे प्रवेश मिळालेला असला पाहिजे.

कर्जासाठी अर्ज कोठे करावा?
कर्ज शक्यतो विद्यार्थ्याच्या पालकांच्या गावी असणाऱ्या शाखेत दिले जाते; क्वचित प्रसंगी शिक्षणसंस्थेच्या गावी देखील ते मिळू शकेल. आजकाल बहुतेक सर्व बँका त्यांच्या वेबसाईटवर कर्जाचा अर्ज उपलब्ध करून देतात. NSDL[National Securities Depository Limited] च्या वेबसाईटवरूनही हा अर्ज पाठवता येतो. त्यासाठी NSDL ने विद्यालक्ष्मी या नावाने एक चांगली वेबसाईट तयार केली आहे. त्यावरून विद्यार्थी एकाच वेळेस अनेक बँकांना सुध्दा अर्ज देऊ शकतो.
कर्ज किती मिळू शकते?
देशांतर्गत पाठ्यक्रमांसाठी कमाल मर्यादा रु.१० लाखांची असून परदेशी शिक्षणासाठी ती रु. २० लाख इतकी आहे.