भारतीय वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमासाठी (PG-Post Graduation) गुणवत्ता तपासणी निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार केंद्रीय पातळीवर मेडिकल प्रवेशासाठी एकच प्रवेश परीक्षा असावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सूचित केले होते. ‘नॅशनल एलिजिबिलिटी अॅ न्ड एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट - NEET ) ही राष्ट्रीय स्तरावरील मेडिकल प्रवेश परीक्षा आहे. ‘एमबीबीएस’ किंवा ‘बीडीएस’ या क्षेत्रातील करीअर म्हणून निवडण्याची तयारी असणार्या विद्यार्थ्यांकरता ही परीक्षा अतिशय महत्त्वाची असते.
सर्व राज्यस्तरीय वैद्यकीय शिक्षणासाठी सन 2016 पासून ‘नीट’परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. यामध्ये वैद्यकीय / दंतचिकित्सा महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी या परीक्षेत ‘कट ऑफ’ पूर्ण करणे अतिशय आव्हानात्मक ठरते. कारण राज्य शासनाच्या नियोजनानुसार गेल्या वर्षीप्रमाणे आरक्षणाची टक्केवारीसुद्धा या प्रवेशप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते.
एकूणच वैद्यकीय महाविद्यालयांतील जागांची माहिती घेतल्यास असे लक्षात येते, की ग्रामीण महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या अपुरी आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षणातील पदवी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना शहरी भागाचा पर्याय निवडावा लागतो. दि. 14 जानेवारी 2017 रोजी जाहीर होणा-या ‘नीट’ - NEET (एनईईटी) ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा सक्तीची झाल्यानंतर पार पडलेल्या पहिल्यावहिल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.
उच्च पदवीधर होण्यासाठी शैक्षणिक प्रवास सुरू करताना प्रवेश परीक्षेतील अपेक्षित गुण हा जसा महत्त्वाचा विषय आहे, त्याप्रमाणेच आरक्षण आणि लाखो रुपयांचे शुल्क हासुद्धा तितकाच महत्त्वाचा मुद्दा ठरतो. पदवीपर्यंतच्या शिक्षणावरच लाखो रुपये खर्च झाल्याने अनेकांना घरची आर्थिक जबाबदारी खुणावत असते. अशा वेळी भविष्यातील व्यवसायातील स्पर्धा आणि अधिक उत्पन्नाच्या संधी मिळविण्यासाठी उच्च शिक्षण घेणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असले, तरी पालकांच्या दृष्टीने शुल्क हा मोठा आणि निर्णायक विषय असतो.
या प्रवेशप्रक्रियेमध्ये शासकीय आणि खासगी महाविद्यालयांतील शुल्कामध्ये प्रचंड तफावत आहे. आणि संधी मिळाली तर लगेच भरावे लागणारे शुल्क हा अनेकांसाठी चिंतेचा विषय बनतो. मग धावपळ सुरू होते, ती प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याची आणि आवश्यक शुल्कासाठीची जमवाजमव करण्याची. यामध्ये योग्य आर्थिक पर्याय, मार्गदर्शन अथवा सल्ला मिळाल्यास प्रवेशप्रक्रिया सुलभरीत्या पूर्ण होईल.
या संदर्भातील अशी गुंतागुंत व काळजीची परिस्थिती टाळायची असेल, तर शैक्षणिक कर्जाच्या पर्यायाचा एकदा तरी जरूर विचार करायलाच हवा... जनता सहकारी बँक ही विश्वसनीय सेवा देण्यासाठी ओळखली जाते. शैक्षणिक कर्ज देताना ग्राहकांच्या गरजेनुसार विविध योजना व पर्याय उपलब्ध करून दिल्याने प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हक्काचा पर्याय उपलब्ध आहे. त्याचा विचार करण्यास काहीच हरकत नाही.