तुम्ही एक स्मार्ट आणि जागरुक मतदाता आहात का ?

04 May 2024 17:46:18

Election Commission


मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाची आजवरची सर्वात मोठी मतदार जागृती मोहीम सध्या राबवण्यात येत आहे. विविध स्तरावर मतदारांना मदत करण्यासाठी, मतदारांनी मोठ्या संख्येने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी जनजागृती केली जात आहे. महाराष्ट्रातील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सोशल मिडीयाच्या माध्यामातूनही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 
जमीन, डोंगर, रस्ते असे कुठलेही अडथळे न मानता निवडणूक आयोगाचे कर्मचारी मतदान साहित्य नियोजित स्थळी घेऊन जात आहेत, एक मतदार असेल तरीही कोणताही भाग मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

 
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया काल संपली. महाराष्ट्रात 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची आज छाननी होत आहे. निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला असून सर्व पक्षांचे उमेदवार आपापल्या मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत.

 
विविध प्रशासकीय स्तरावरही मोठ्या स्तरावर मतदार जागृतीसाठी प्रयत्न होत आहेत.
 
बनावट प्रचार साहित्य प्रसारित केल्यास संबधितांवर कारवाईच्या पोलिस विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
 
निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांत शहरी मतदारसंघातील मतदानामध्ये लक्षणीय घट झाल्याचे आयोगाने म्हटले आहे. तसेच निवडणूक आयोग शहरी जागांवर मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यातील मतदानात ४ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात ३ टक्के मतदानामध्ये घट झाली आहे. पहिल्या टप्प्यात १०२ जागांवर ६६.१४ टक्के मतदान झाले आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात ८८ जागांवर ६६.७१ टक्के मतदान झाले.

Powered By Sangraha 9.0