इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) तंत्रज्ञान

20 Jan 2020 17:13:59

Internet of things _1&nbs
 
इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) हे एक सोशल नेटवर्क किंवा ई-मेल सेवेसारखे आहे, परंतु लोकांना जोडण्याऐवजी आयओटी प्रत्यक्षात स्मार्ट डिव्हाइस कनेक्ट करते. या डिव्हाईसचा वापर घरामध्ये, ऑफिसमध्ये, वाहनांमध्ये केला जातो. या तंत्रज्ञानाचा वापर जसा फायदेशीर आहे तसाच तो धोकादायकही आहे... सायबर गुन्हे व त्याबाबत घ्यावयाची काळजी या विषयावर आधारित जनता सहकारी बँकेच्या ‘सायबर क्राईम अवेअरनेस’ या लेखमालिकेतील ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ याविषयी माहिती देणारा हा आठवा लेख...
.........................................................................
 
इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) हे एक सोशल नेटवर्क किंवा ई-मेल सेवेसारखे आहे, परंतु लोकांना जोडण्याऐवजी आयओटी प्रत्यक्षात स्मार्ट डिव्हाइस कनेक्ट करते. ज्यात संगणक, स्मार्टफोन, स्मार्ट होम अप्लायन्सेस, ऑटोमेशन साधने इत्यादींचा समावेश होतो. आयओटी “कनेक्ट केलेल्या घरात तुमचा स्मार्ट टीव्ही आपल्या वायरलेस प्रिंटरशी कनेक्ट होऊ शकेल. आपला गेम कन्सोल आपल्या स्मार्ट लाईट बल्बसह कम्युनिकेट करण्यास प्रारंभ करू शकेल. यापद्धतीने हे आयओटी वेगाने वाढत आहे.
या दिवसात, आयओटीशी कनेक्ट केलेल्या डिव्हाइसमध्ये राउटर, प्रिंटर, थर्मोस्टॅट्स, रेफ्रिजरेटर, वेबकॅम, अ‍ॅमेझॉन अलेक्सा, अॅपलचे सिरी आणि गूगल असिस्टंट यांसारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या होम ऑटोमेशन हबचा समावेश आहे. यामध्ये स्मार्ट लॉक, स्मार्ट वॉचेस आणि बर्‍याच इतर गॅझेट्सचा देखील समावेश होतो जे आपण एक तर घरी ठेवतो किंवा वापरतो. 


अ‍ॅमेझॉन अलेक्साचा वापर करण्यात आलेली जाहिरात विविध टीव्ही वाहिण्यांवर आपण पाहिली असेल, ज्यामध्ये घरी मेजवानीसाठी बोलवलेल्या पाहुण्यांचा मेसेज अलेक्सा आपल्याला सांगते, मेसेज ऐकल्यावर अलेक्साला पार्टी म्युझिक वाजविण्यास सांगितले जाते. त्या म्युझिकच्या तालावर पती-पत्नी नाच करतात. हे एक इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) तंत्रज्ञान वापराचे उदाहरण आहे. अशाच प्रकारे इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) तंत्रज्ञानाचा वापर घरामध्ये, ऑफिसमध्ये, वाहनांमध्ये केला जातो. या तंत्रज्ञानाचा वापर जसा फायदेशीर आहे तसाच तो धोकादायकही आहे. 
‘आयओटी’चा वापर असलेल्या ठिकाणी कोणते धोके उद्भवू शकतात...?
१. इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) डिव्हाईसशी जोडण्यात आलेला एखादा संगणक जर हायजॅक झाला, तर ईमेलद्वारे स्पॅम मेल पाठवल्या जाऊ शकतात.
२. इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) डिव्हाईस दुर्भावनायुक्त बॉटनेटला कनेक्ट केला जाऊ शकतो व त्याचा उपयोग संगणक वापरणाऱ्या व्यक्तीस संगणक प्रणाली वापरास अडथळे निर्माण (डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ अॅटॅक) करण्यासाठी केला जाऊ शकतो.
३. बऱ्याच इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) उपकरणाद्वारे पाठविण्यात येणारे मेसेजेस कूटबद्ध (इंक्रीप्टेड) पद्धतीने पाठविले जात नाहीत, त्यामुळे त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो.
४. ‘आयओटी’ डिव्हाईसमधील त्रुटींचा/असुरक्षित बाबींचा कुशल हॅकर्स शोध लावतात आणि त्याद्वारे घरातील, ऑफिसमधील गोपनीय बाबी लिक करतात किंवा त्याचा गैरवापर करतात.
५. ‘आयओटी’ वापरकर्त्यांची संभाषणे रेकॉर्ड करण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून या झिरो डे अटॅकचा वापर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, हॅकर एखाद्या संस्थेमध्ये स्मार्ट कॅमेर्‍यावर हल्ला करू शकतो आणि दररोजच्या व्यवसाय क्रियाकलापांचे व्हिडिओ फुटेज रेकॉर्ड करू शकतो. या दृष्टीकोनातून सायबर गुन्हेगार गोपनीयपणे व्यवसायाची गोपनीय माहिती मिळवू शकतात. 
६. ‘आयओटी’ उपकरणाशी घरातील स्मार्ट टीव्ही, वेबकॅम जोडला असेल आणि जोडणीत काही त्रुटी राहिल्या असतील, तर सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेऊन तुमच्या वैयक्तिक जीवनातील खासगी संभाषण किंवा अन्य घडामोडींचे रेकॉर्डिंग करून गैरफायदा घेऊ शकतात. खंडणी मागू शकतात.
७. ‘आयओटी’ उपकरण वाहनाशी जोडले असेल, तर सायबर गुन्हेगार वाहनाचा ताबा मिळवू शकतो.


काय काळजी घ्यावी...?
 
१. ‘आयओटी’ उपकरणास जोडलेल्या अन्य सर्व उपकरणाच्या कनेक्टीव्हिटीचा नकाशा बनवावा.
२. घरी अथवा ऑफिसमध्ये ‘आयओटी’ उपकरणाशी जोडलेल्या सर्व अन्य उपकरणांची नोंद ठेवावी.
३. सर्व उपकरणांसाठी उपलब्ध असलेले अद्ययावत फर्मवेअर/सिक्युरिटी पॅचेस वेळोवेळी इन्स्टॉल करावेत.
४. उत्पादकांनी उपकरणांसोबत दिलेले डिफॉल्ट पासवर्ड व सेटिंग बदलावेत व सदर उपकरण सुरक्षित करण्याच्या दृष्टीने योग्यते बदल करून घ्यावेत.
५. सेटिंग बदलासाठी उपकरण उत्पादकांची, अभियंत्यांची आवश्यक ती मदत घ्यावी, परंतु पासवर्ड बदलताना त्याची माहिती स्वतःपूरती मर्यादित (गोपनीय) ठेवावी.
६. सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कचा वापर टाळावा.
७. स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप किंवा संगणकास युएसबीद्वारे वेबकॅम जोडला असेल, तर वापरात नसताना डिस्कनेक्ट करून ठेवावा.
८. स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप किंवा संगणकामध्ये इनबिल्ट वेबकॅम असेल, तर तो वापरात नसताना इंश्युलेशन टेपचा छोटा तुकडा लावून झाकून ठेवावा, जेणेकरून आपल्या नकळत त्याचा वापर सायबर गुन्हेगार करू शकणार नाही.
९. आवश्यकता नसेल तेव्हा घर किंवा ऑफिसमधील इंटरनेट सुविधा शक्यतो बंद ठेवावी.
Powered By Sangraha 9.0